Tarun Bharat

वेंगुर्लेची साहित्य परंपरा पुढील पिढीने जतन करावी -सौ. वृंदा कांबळी

वेंगुर्ले / प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्याला समृध्द अशी साहित्य परंपरा लाभलेली आहे. अधिकाधिक लेखकांनी कथा वाड:मय प्रकारात लेखन करावे. त्यासाठी लागणारे श्रम, वाचन, अभ्यास करावा व वेंगुर्ल्याची साहित्य परंपरा पुढील पीढीने जतन करावी असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखिका सौ. वृंदा कांबळी यांनी साईमंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.
वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाड:मय मंडळाच्यावतीने येथील साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात कथालेखन विषयावर “कथा सृजनाच्या वाटेवर” या कार्यक्रमाचे उदघाटन श्रीदेवी सातेरी देवस्थानचे विश्वस्त रविंद्र परब यांचे हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरात सुप्रसिध्द लेखिका तथा या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक सौ. वृंदा कांबळी, अजित राऊळ, प्रदीप केळुसकर, संजय पाटील, विशाल उगवेकर, ईश्वर धडके, सोमा गावडे, महेश राऊळ, गुरूदास तिरोडकर, प्रा. सचीन परूळकर, श्राव्या कांबळी, राजश्री परब, प्रितम ओगले, प्राजक्ता आपटे, माधवी मातोंडकर, सौ. राऊळ, कौलापुरे सर, पी. के. कुबल, सीमा मराठे यांचा समावेश होता.

Related Stories

‘तरूण भारत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा उद्या 26 वा वर्धापनदिन

Patil_p

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर जेता

NIKHIL_N

सावंतवाडीत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनची स्थापना

Anuja Kudatarkar

वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : टाळेबंदीमुळे मिरकरवाडा बंदरावर शुकशुकाट

Archana Banage

खळबळजनक !मालवणात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह

Anuja Kudatarkar