Tarun Bharat

चिमुरडीने सापाचेच केले दोन तुकडे

Advertisements

सापाने दंश केल्याने आला होता राग

सापाला पाहून भल्याभल्यांची घाबरगुंडी उडते, परंतु एका चिमुरडीने सापाची केलेली अवस्था पाहून प्रत्येक जण चकित झाला आहे. प्रथम या सापाने या मुलीला दंश केला होता. यामुळे रागावलेल्या मुलीने या सापाला दाताने चावून त्याचे दोन तुकडे केले आहेत.

ही घटना तुर्किये येथील एका गावात घडली आहे. या दोन वर्षीय मुलीला सर्वप्रथम तिच्या शेजाऱयांनी पाहिले होते. मुलीची आरडाओरड ऐकून हे शेजारी तेथे पोहोचले होते. परंतु तेथील चित्र पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण मुलीच्या तोंडात अर्धा मीटर लांबीचा साप होता. तसेच मुलीच्या चेहऱयावर सापाच्या दंशाच्या खुणा होत्या.

शेजाऱयांनी प्रथम मुलीला सापापासून वेगळे केले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. जेथे तिला 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. या मुलीची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

या घटनेची आता सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे. खेळताना हा साप या मुलीच्या नजीक पोहोचला होता. तेव्हा खेळणी समजून मुलगी या सापाशी खेळू लागली. याचदरम्यान सापाने मुलीच्या चेहऱयावर दंश केला. याच्या प्रत्युत्तरादाखल मुलीनेही सापाचा स्वतःच्या दातांनी चावा घेतला. या घटनेत सापाचा मृत्यू झाला. सापाचे जवळपास दोन तुकडे झाले होते.

घटनेवेळी मुलीचे वडिल कामासाठी बाहेर होते. घरी परतल्यावर या घटनेची माहिती कळताच त्यांना धक्का बसला. माझ्या मुलीला देवानेच वाचविल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

जुळय़ा भावांचा जुळय़ा बहिणींशी विवाह

Patil_p

पोलीस मित्रांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत

prashant_c

पारंपारिक बी-बियाण्यांबाबात कृषितज्ज्ञांनी दाखवलेली अनास्था चिंतनीय

prashant_c

अचूक वेळ साधणे महत्त्वाचे

Patil_p

नूडल्सवर कोरले जातात धर्मग्रंथ

Patil_p

‘येथे’ मरण्यावरच बंदी

Patil_p
error: Content is protected !!