नजीकच्या भविष्यकाळात प्रसारित होऊ घातलेल्या ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या मालिकेच्या पाच सत्रांसाठी एक अब्ज डॉलर किंवा साधारणतः आठ हजार कोटी रुपये खर्च केले जातील, असे सांगण्यात आले आहे. याच मालिकेच्या यापूर्वीच्या सत्रात प्रत्येक भागावर 463 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. 3 हजार 700 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले हे पहिले सत्र जगातील सर्वात महागडी मालिका ठरलेले आहे. या मालिकेच्या एका एपिसोडच्या खर्चात मध्यम खर्चाचे सहा हिंदी चित्रपट निर्माण होऊ शकतात.
प्रसारणाआधीच या मालिकेचे दुसरे सत्र प्रचंड प्रसिद्धी मिळवून आहे. भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी मालिका ‘सेपेड गेम्स’ ही आहे. या मालिकेचा पहिला हंगाम केवळ 40 कोटी रुपयांमध्ये बसला होता. तर दुसऱया हंगामासाठी 100 कोटी खर्च करावे लागले होते. या दोन्ही मालिकांच्या एकत्रित खर्चाच्या दुप्पट ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या मालिकेचा एक एपिसोड आहे.
‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या मालिकेची ‘रिंग्ज ऑफ पॉवर’ ही एक उपमालिका आहे. या सप्टेंबर महिन्यात अमेझॉन प्राईमवर तिचे प्रसारण होणार आहे. या मालिकेसाठी अमेझॉनने 46.4 कोटी डॉलर्स ओतले आहेत. या मालिकेत ‘मिडल अर्थ’ ही दीर्घकथा दाखविली जाणार आहे. या कथेवर आजपर्यंत कधीही इतक्मया मोठय़ा खर्चाची मालिका बनलेली नाही. या मालिकेच्या अर्थसंकल्पाचा एक तृतियांश भाग केवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर खर्च होणार आहे. या मालिकेतील प्रत्येक प्रसंग अतिशय गांभीर्याने आणि सखोल अभ्यास करून तयार करण्यात आला आहे. खर्चाचा विचार न करता गुणवत्तेवर भर देण्यात आला आहे. मालिकेच्या पहिल्या सत्रात 3 हजार 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एकंदर या मालिकेच्या दुसऱया सत्रासंदर्भात चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.