Tarun Bharat

जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यप्रवेशद्वार बंद

Advertisements

जिल्हाधिकाऱयांच्या नव्या आदेशामुळे सारेच आश्चर्यचकित : दक्षिणेकडून प्रवेश देणार

प्रतिनिधी /बेळगाव

विविध समस्या मांडण्यासाठी, कामांसाठी सर्वसामान्य जनता जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार ठोठावते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट बंद ठेवण्याचा निर्णय नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला आहे. यामुळे सारेच आश्चर्यचकित झाले असून आता आम्ही तक्रारी कोणाकडे मांडायच्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र दक्षिण बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराकडून सर्वांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार सकाळी 10 पासून सायंकाळी 6 पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक वेळ खुले ठेवले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाला जाण्यासाठी दोन्ही बाजूने प्रवेशद्वार आहेत. मात्र मुख्य प्रवेशद्वारावरूनच सारेजण जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत असतात. विविध कार्यालये या इमारतीत आहेत. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य जनतेला आता दक्षिणेकडे असलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करावा लागणार आहे.

दक्षिण बाजूला उपनोंदणी कार्यालय, तालुका पंचायत, भू-मापन, टुरिझम यासह इतर कार्यालये आहेत. त्यामुळे त्याठिकाणी मोठी गर्दी होत असते. यातच आता जिल्हाधिकारी कार्यालयातही दक्षिणेच्या बाजूने प्रवेश सुरू केल्यामुळे मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण दोन्ही बाजूला जिना असला तरी प्रवेशद्वारासमोरच वाहनांचे पार्किंग केले जात आहे. याचबरोबर थांबण्यासाठीही कोणताही आडोसा नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. कोणताही मोर्चा किंवा आंदोलने आल्यास त्याठिकाणी थांबायलादेखील जागा नाही. या निर्णयामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्मयता आहे. मोर्चा किंवा आंदोलने झाल्यास गोंधळ उडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. 

Related Stories

काळय़ादिनी काळे ध्वज, काळा मास्क, काळी फीत

Patil_p

तीन मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या

Patil_p

कर्नाटक सरकार महिला कोविड योद्ध्यांना साड्या वाटप करणार

Archana Banage

समितीचा अनगोळ येथे प्रचार-पदयात्रा

Amit Kulkarni

सप्तसूर संगीत विद्यालयातर्फे गुरुवंदना कार्यक्रम

Amit Kulkarni

गुलबर्ग्यात कोरोनाचा आणखी एक बळी

Tousif Mujawar
error: Content is protected !!