सेन्सेक्स निर्देशांकात 304 अंकांची घसरण : रिलायन्स नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय शेअरबाजार सलग दुसऱया दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. वित्तसंस्थांचे समभाग सर्वाधिक घसरणीत होते.
गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 304 अंकांनी घसरत 60,353.27 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 50 अंकांनी घसरत 17,992.15 अंकांवर बंद झाला आहे. निफ्टीतील वित्तसेवा निर्देशांक 1.2 टक्के इतका घसरला असून बँक निफ्टी निर्देशांक 0.8 टक्के घसरला आहे. यामध्ये बजाज फायनान्स कंपनीचे समभाग सर्वाधिक 7 टक्के इतके घसरले होते. याच्या पाठोपाठ बजाज फिनसर्व्हचा समभाग घसरणीत राहिला होता. वित्त आणि बँकींग क्षेत्रातील समभाग नकारात्मक कल दर्शवत असल्याने त्याचे पडसाद भारतीय शेअरबाजारावर दिसून आले. दुसरीकडे जागतिक स्तरावरती फेडरल बँकेच्या निर्णयाबाबत गुंतवणूकदारांमध्ये काहीशी चिंता राहिली होती. यामुळेही भारतीय बाजार घसरणीकडे कल दाखवत होता. सुरुवातीला भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वधारत खुला झाला. कच्चा तेलाच्या किंमतीतही गुरुवारी चढउतार दिसून आला. तेल आणि वायू क्षेत्राच्या निर्देशांकांनी मात्र 2 टक्के इतकी तेजी दाखविली होती. याला ऊर्जा, एफएमसीजी, ऑटो आणि धातू निर्देशांकांनी तेजी दर्शवत बाजाराला आधार देण्याचा प्रयत्न केला. आयटी आणि कंझ्युमर डय़ुरेबल क्षेत्राचा निर्देशांक घसरणीत राहिला होता.
जागतिक बाजारामध्ये युरोपियन बाजार घसरणीत दिसला. गेले तीन दिवस हा बाजार तेजी दर्शवत होता. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा परिणाम युरोपियन बाजारावरती नकारात्मक दिसून आला. आशियाई बाजारामध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 30 समभागांपैकी 14 समभाग तेजीत तर 16 समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्ये डाबर, सिप्ला, आयटीसी, बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ, महिंद्रा आणि महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग तेजीसह बंद झाले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- हिरोमोटोकॉर्प 2767
- सिप्ला……… 1088
- एनटीपीसी….. 169
- आयटीसी……. 333
- जेएसडब्ल्यू स्टील 750
- बजाज ऑटो.. 3621
- एचयुएल…… 2583
- ब्रिटानिया…. 4313
- एचडीएफसी लाईफ….. 609
- बीपीसीएल…. 342
- महिंद्रा आणि माहिंद्रा 1252
- आयशर मोटर्स 3257
- नेस्ले………. 19676
- सनफार्मा….. 1016
- अदानी पोर्टस.. 819
- डॉ. रेड्डीज लॅब्ज 4297
- हिंडाल्को…….. 462
- लार्सन टुब्रो… 2087
- डिव्हीज लॅब्ज 3461
- टाटा स्टील….. 116
- एचसीएल टेक 1044
- युपीएल……… 720
- ग्रेसीम……… 1698
- कोल इंडिया…. 218
- मारुती सुझुकी 8461
- टाटा मोटर्स…. 386
- ओएनजीसी…. 146
- अदानी एंटरप्रायजेस 3829
समभाग घसरलेल्या कंपन्या
- बजाज फायनान्स 6100
- बजाज फिनसर्व्ह 1468
- आयसीआयसीआय बँक 879
- टायटन…….. 2562
- इन्फोसिस…. 1475
- पॉवरग्रिड कॉर्प 208
- टेक महिंद्रा… 1011
- ऍक्सिस बँक…. 949
- विप्रो…………. 386
- एचडीएफसी बँक 1599
- इंडसइंड बँक. 1215
- भारती एअरटेल 807
- एशियन पेंटस् 3004