साहित्य खरेदीसाठी पालकांची बाजारात गर्दी : विविध प्रकारच्या वहय़ांसह छत्र्या-रेनकोट खरेदीकडेही कल
प्रतिनिधी /बेळगाव
एक महिन्याची उन्हाळी सुट्टी संपली आणि 16 मे पासून शाळा सुरू झाल्या. नवीन इयत्तेत विद्यार्थ्यांचा प्रवेश होत असल्याने दरवषी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश, नवीन शूज, नवीन पाठय़पुस्तके, नवीन दप्तर याचबरोबर आता थोडय़ा दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने छत्र्या, रेनकोट खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांची बाजारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सध्या तरी शैक्षणिक साहित्याची रेलचेल दिसून येत आहे.
शालेय मुलांना आकर्षित करण्यासाठी काही शैक्षणिक साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. जसे की कार्टुन्सच्या रंगीबेरंगी आणि टेडी, बारबी डॉलच्या छत्र्या, रेनकोट तसेच कार्टुन्सच्या वहय़ा, पेन अशा प्रकारचे अनेक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या साहित्यांना अधिक मागणी आहे. यावषी शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सुद्धा शैक्षणिक साहित्य बाजारात आले आहे. यावषी शैक्षणिक साहित्यात अनेक प्रकार आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यार्थ्यांना ते साहित्य खरेदी करताना आनंद होत आहे.
अनेक प्रकारच्या वहय़ा बाजारात विक्रीला
यावषी अनेक प्रकारच्या आणि अनेक कंपन्यांच्या वहय़ा बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. जसे की राजश्री, सुलेखा, क्लासमेंटस यासारख्या वह्यांना आजकाल खूप मागणी वाढली आहे. तसेच यांच्या किंमती 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत असून सर्वसामान्यांना परवडेल अशा आहेत. पूर्वीच्या विद्या, लेखक, राज या कंपन्यांच्या वह्या बंद झाल्या असून आताच्या वह्यांच्या पेपरचा दर्जा अधिक चांगला असल्याचे दुकानदार सांगत आहेत.
तसेच यावषी काट्रेज पेन, बॉल पेन, जेल पेन या पेनांना अधिक मागणी असून याची किंमत 50 रुपयापासून 70 रुपयांपर्यंत आहे. पूर्वीचे इंक पेन बंद झाल्यामुळे आता यूज ऍण्ड थ्रो पेनांना सर्वाधिक मागणी आहे. याची किंमत 3 रुपांपासून सुरू आहे. इंक पेन बंद झाल्यामुळे काट्रेज पेन खरेदीवर विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.
5 फोल्ड छत्र्यांना अधिक मागणी
यावषी 5 फोल्ड छत्र्यांना अधिक मागणी आहे. 5 फोल्डच्या छत्र्या नाजूक असतात. पण लोकांना सोयीच्या छत्र्या पाहिजे असल्यामुळे या छत्र्यांना अधिक मागणी आहे. त्याचबरोबर पूर्वी लांब छत्र्यांना खूप मागणी होती. पण आता त्यांची मागणी कमी झाली असून महिलावर्ग फॅशनसाठी या लांब छत्र्यांचा वापर करत असल्याचे दिसते. आधी चांगल्या छत्र्यांची किंमत 300 पासून सुरू होती. पण आता त्यात थोडी वाढ झाली असून 350 रुपये चांगल्या छत्र्यांची किंमत आहे. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी टेडी, डोरेमॉन, बरबीडॉल, छोटाभीमच्या छत्र्या आणि रेनकोट बाजारात आले आहेत.
लहान मुलांसाठी टेडीच्या बारबी डॉल, स्पायडरमॅनच्या बॅग यावषी बाजारात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना बॅग मिळत आहेत. पूर्वीच्या आडव्या बॅगांना मागणी नसल्यामुळे त्या आता बंद होऊन फॅन्सी बॅगांची मागणी वाढली आहे. लहान मुलांच्या बॅगांची किंमत 150 पासून 600 रुपयांपर्यंत आहे. तर फॅन्सी आणि चांगल्या कंपनीच्या बॅगची किंमत 350 ते 400 रुपये आहे. त्यामुळे यावषी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार बॅगांची विक्री सुरू आहे.
पॅरागॉन, व्हीकेसी कंपनीच्या शूजना अधिक मागणी
अनेक प्रकारचे शालेय शूज असून पॅरागॉन, व्हीकेसी कंपनीच्या शूजना अधिक मागणी आहे. लहान मुलांपासून मोठय़ा मुलांपर्यंतचे शूज आपल्याकडे आहेत. ब्लॅक, व्हाईट तसेच लेस नसलेले सर्व प्रकार असून याची किंमत 150 पासून 580 पर्यंत असल्याचे दिसून येते. विशेष करून सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना सरकारकडून शुज मिळतात. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शूजचे वितरण करण्यात आले नाही. परिणामी यावषी तरी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शूज मिळतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.