Tarun Bharat

पतधोरण बैठकीनंतर बाजार सावरला

Advertisements

सेन्सेक्सची तब्बल 1,017 अंकांची उसळी ः घसरणीला अखेर विराम

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजाराने मागील सातही सत्रांमध्ये सलगची घसरण नोंदवली आहे. मात्र चालू सप्ताहाच्या अंतिम सत्रात शुक्रवारी मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण बैठकीनंतर घसरणीला पूर्ण विराम मिळाल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्सने तब्बल 1,000 अंकांपेक्षा अधिकची उसळी प्राप्त केल्याची नोंद करण्यात आली आहे.

आरबीआयने पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्के इतका केला आहे. एकूण मिळून मे महिन्यांपर्यंत आरबीआय रेपोदरात 1.90 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. यासोबतच सलग सात सत्रांमध्ये घसरणीनंतर बाजार शुक्रवारी सावरत आहे.

यामध्ये बीएसई सेन्सेक्स 1,016.96 अंकांनी वधारुन 1.80 टक्क्यांसोबत निर्देशांक 57,426.92 वर बंद झाला आहे. काहीवेळ सेन्सेक्सने 1,312.67 अंकांची मजबूत स्थिती प्राप्त केली होती. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 276.25 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 17,094.35 वर बंद झाला आहे.

एमके ग्लोबल फायनान्शियलचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ माधवी अरोडा यांनी म्हटले आहे, की पतधोरणातून रेपोदरात 0.50 टक्क्यांची वृद्धी होणार होती. ती अखेर झालीच. जागतिक पातळीवरील सर्व घटनांमुळे व्याजदर अपेक्षीत होती.

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, टायटन, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक आणि टाटा स्टील यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये डॉ.रेड्डीज लॅब, एशियन पेन्ट्स, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.

आशियातील अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे नुकसानीत राहिले आहेत. तर हाँगकाँगचा हँगसेंग हा मजबूत होत बंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.19 टक्क्यांनी वधारुन 89.54 डॉलर प्रति बॅरेलवर आले आहे.

Related Stories

पियुष अरोरा फॉक्सवॅगेन इंडियाचे ‘एमडी’

Patil_p

एलॉन मस्ककडून समभाग दान

Patil_p

शेअर बाजारात घसरणीचे सत्र कायम

Omkar B

हिंदुस्थान कॉपरची वार्षिक उत्पादन वाढवण्याची योजना

Patil_p

हिरो इलेक्ट्रिकची डोकेदुखी वाढली

Patil_p

टाटा स्टील 270 कोटींचा देणार बोनस

Amit Kulkarni
error: Content is protected !!