अखेर दोन दिवसांच्या घसरणीला विराम : रिलायन्स सर्वाधिक तेजीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात मागील दोन दिवसांच्या घसरणीला अखेर गुरुवारच्या चौथ्या सत्रात पूर्ण विराम मिळाल्याचे दिसून आले. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 437 अंकांनी लाभात राहिल्याचे दिसून आले. निर्देशांकांची मजबूत स्थिती कायम ठेवण्यात रिलायन्स इंडस्ट्रीजला यश मिळाल्याने मजबूत लिलाव झाला. दुसऱया बाजूला जागतिक बाजारात सकारात्मक कल राहिल्याचा फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने गुरुवारचे सत्र सावरल्याचे दिसून आले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 436.94 अंकांनी मजबूत होत 55,818.11 वर बंद झाला. काहीवेळ सेन्सेक्स 510.75 अंकांनी उच्चांकावर राहिला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 105.25 अंकांनी वधारुन निर्देशांक 16,628.00 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये समभागात रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा, एचसीएल टेक, टीसीएस, एशियन पेन्ट्स, इन्फोसिस आणि इंडसइंड बँक यांचे समभाग लाभात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी लि., हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रिड कॉर्प आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
सकारात्मक घटनांचा प्रभाव
शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास प्रामुख्याने जीएसटी संकलन आणि पीएमआयचे महत्त्वपूर्ण आकडे सकारात्मक राहिले व कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण राहिल्याचा फायदा देशातील शेअर बाजाराला घेण्यात यश मिळाले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. भारत व अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या पॉलीसीवर तज्ञांचे लक्ष राहणार असून यांची घोषणा आगामी दोन सप्ताहात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे नुकसानीत राहिले असून चीनचा शांघाय कम्पोझिट वधारला आहे. युरोपीयन प्रमुख बाजारात दुपारपर्यंत तेजीचा कल राहिला होता. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 2.21 टक्क्यांनी घटून 113.7 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. बुधवारी शेअर बाजारात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1,930.16 कोटी रुपये किमतीच्या समभागांची विक्री केली आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2724
- बजाज फिनसर्व्ह 12961
- सन फार्मा………. 859
- एचसीएल टेक… 1039
- टीसीएस………. 3422
- इन्फोसिस…….. 1507
- एशियन पेन्ट्स.. 2908
- टाटा स्टील……. 1081
- इंडसइंड बँक……. 942
- एनटीपीसी……… 159
- टायटन………… 2221
- नेस्ले………….. 17409
- बजाज फायनान्स 6059
- ऍक्सिस बँक…….. 691
- विप्रो…………….. 474
- आयटीसी……….. 273
- अल्ट्राटेक सिमेंट. 6007
- स्टेट बँक…………. 469
- भारती एअरटेल 695
- डॉ.रेड्डीज लॅब… 4328
- फेडरल बँक……….. 92
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एचडीएफसी….. 2289
- पॉवरग्रिड कॉर्प…. 225
- हिंदुस्थान युनि.. 2284
- एचडीएफसी बँक 1385
- कोटक महिंद्रा…. 1857
- आयसीआयसीआय 750
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1044
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1645
- मारुती सुझुकी… 7924
- टेक महिंद्रा……. 1146
- अपोलो हॉस्पिटल 3645
- हिरोमोटो……… 2663
- कोलगेट……….. 1590
- अरोबिंदो फार्मा… 532
- आयशर मोर्ट्स… 2730
- टाटा मोर्ट्स…….. 439
- पिरामल एन्टर.. 1816
- हॅवल्स इंडिया… 1176
- बंधन बँक……….. 329
- एसबीआय लाईफ 1141
- ज्युबिलंट फूड…… 552