काठावरील बहुमत अबाधित राखण्याचे मात्र आव्हान. आता भाजपचेच नगरसेवक 12 ? तरीही करावी लागणार तारेवरची कसरत.
रविराज च्यारी /डिचोली
विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांविरोधात काम केल्याच्या कृतीचा स्पोट घडवत डिचोली नगरपालिकेतील दहा पैकी सहा भाजप नगरसेवकांनी चार नगरसेवकांना पालिकेतील सत्तेपासून बाहेर ठेवले व मगोतीत दोन नगरसेवकांना बरोबर घेत अखेर उपनगराध्यक्षा तनुजा राजाराम गावकर यांना पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले. त्यानंतर नवीन उपनगराध्यक्ष निवडीपर्यंत समोर आलेली सर्व आव्हाने सर करीत नगराध्यक्ष पुंडलिक उर्फ कुंदन फळारी यांनी आठ जणांचा गट अबाधित राखण्यात यश मिळविले खरे. पण आता हा गट अबाधित राखण्याचे आव्हान नगराध्यक्ष फळारी यांच्यासमोर आहे.
डिचोली नगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यास अजून चार वर्षे बाकी आहेत. नगरपालिकेला एक वर्ष होण्यापूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीने मात्र अनेकांचे पितळ उघडे पाडले. भाजप पक्षाने दिलेल्या उमेदवाराला सध्या सत्तेतून बाहेर ठेवण्यात आलेल्या चार नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये पडलेली अत्यंत कमी मते या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला किती प्रमाणात प्रामाणिकपणे काम केले ते दर्शवते. याच कारणास्तव डिचोली नगरपालिकेतील इतर भाजपच्या सहा नगरसेवकांनी पक्षश्रे÷ाrंच्या सुचनेनुसार या चार नगरसेवकांना सत्तेबाहेर ठेवण्याच्या राजकारणाची खेळी खेळली. आणि त्यात ते यशस्वीही झाले.
अखेर मगोने दिली भाजपला साथ
नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या नेतृत्वाखाली विजयकुमार नाटेकर, अनिकेत चणेकर, निलेश टोपले, सुदन गोवेकर, दिपा पळ हे सहा नगरसेवक एकत्रित राहून डिचोली नगरपालिकेच्या राजकीय नाटय़ाला प्रारंभ झाला. चौदा नगरसेवकांच्या या नगरपालिकेत आठ जणांचे बळ आवश्यक आहे. त्यासाठी या गटाने सध्या मगो पक्षाचे सुखदा कमलाकर तेली व अँड. रंजना समीर वायंगणकर यांना बरोबर घेतले आहे. या मगोच्या दोन नगरसेविकेंचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली भाजप पालिका मंडळात स्वागत केले होते. सर्वप्रथम यासाठी नगरसेवक गुंजन कोरगावकर व अँड. अपर्णा फोगेरी यांच्या नावाचा विचार झाला होता. परंतु या नगरसेवकांना बरोबर घेण्याची खेळी यशस्वी होऊ न शकल्याने अखेर तेली व वायंगणकर यां?ना बरोबर घेण्यात आले.
उपनगराध्यक्षा ठरल्या बिनविरोध
सध्या या राजकारणात भाजपचे सहा आणि मगोचे दोन असे मिळून आठ नगरसेवकांचे बळ सत्ताधारी गटाकडे आहे. त्यामुळे या गटातर्फे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यश मिळवीत नगरसेविका सुखदा तेली यांची वर्णी लावली. विरोधी गटातील सहाही नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने तसेच सुखदा तेली यांच्या विरोधात एकही नगरसेवकाने अर्ज न भरल्याने उपनगराध्यक्ष निवडणूक बिनविरोध झाली आणि त्यात सुखदा तेली यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर तेली यांनी आमचा आठ जणांचा गट एकसंध असून सर्व चौदाही प्रभागांमध्ये कोणत्याही भेदभावाविना विकासाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
डिचोली नगरपालिकेत भाजपचे 12 नगरसेवक !
यावरच प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी नगरपालिका भाजपकडेच राहिली असून सत्तेसाठी आठ जणांचा गट स्थापन झाला आहे. इतर चार भाजपच्या नगरसेवकांना कोणीही काढले नसून ते आजही भाजपबरोबरच असून आता दोन नगरसेवक वाढल्याने डिचोली नगरपालिकेतील भाजप नगरसेवकांची संख्या बारा झाली असल्याचे म्हटले होते. परंतु या नगरपालिकेचे वास्तविक स्वरूप पाहिल्यास इतर चार भाजपचे नगरसेवक हे या सत्ताधारी गटावर नाराजच आहेत. या नगरसेवकांसह माजी आमदार नरेश सावळ गटाचा एक व आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? गटाचा एक असे दोन नगरसेवक साथीला आहेत. त्यामुळे विरोधी नगरसेवकांचा गट सहा जणांचा आहे.
अनुभवी व धूर्त राजकारण्यांपासून सावध रहावे लागेल
dन या गटात अनुभवी व धुर्त राजकारणी असल्याने नुकत्याच पार पडलेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेत प्रयत्नांची मोठी शिकस्त करण्यात आली होती. सत्ताधारी आठ जणांच्या गटातील काहींना आपल्या गटात ओढण्यासाठी अनेक प्रलोभने, पदांची ऑफर्स देण्यात आली होती. परंतु सत्ताधारी नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या गटातील नगरसेवक सदर ऑफर्सना न बधल्याने हा आठ जणांचा गट एकसंध व शाबूत राहिला आणि त्यांच्याच गटाचा उपनगराध्यक्ष झाला.
आठ नगरसेवकांना दिलेल्या आश्वासनांची कदर करावीच लागणार
मात्र या चौदा नगरसेवकांच्या नगरपालिकेत आठ जणांचा गट घेऊन चालणे म्हणजे सत्ताधारी गटाचे नेते असलेले नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या समोर हा गट अबाधित राखून पालिका चालविणे हे एक मोठे आव्हान आहे. कारण विरोधी गटातील नगरसेवक सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांना आपल्यासोबत घेऊन त्यांना हवे असलेले पद देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या तारेवरच्या कसरतीत नगराध्यक्ष फळारी तसेच भाजप पक्षश्रे÷ाrंना सध्या असलेल्या सत्ताधारी आठ नगरसेवकांना आपल्याकडे राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांच्या सर्व राजकीय आश्वासनांची कदर करावी लागणार आहे.
नगराध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे
येणारी चार वर्षे जर हि पालिका नगराध्यक्ष कुंदन फळारी यांना आपल्या नेतृत्वाखाली भाजपकडेच राखून ठेवायची असल्याच तारेवरची कसरत खेळावी लागणार आहे. सध्या दोन मगोच्या नगरसेवकांची घेतलेली साथ पुढील चार वर्षे निर्विवाद आपल्याकडे ठेवायची असल्यास त्यांना दिलेली सर्व आश्वासने पाळावी लागणार आहेत. तसेच भाजपच्या इतर सहाही नगरसेवकांना सर्वप्रथम सांभाळावे लागणार आहे. सत्ता राखण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या नगरसेवकांकडूनच भविष्यात बाजी उलटून लावण्यात येऊ नये यासाठी नगराध्यक्ष कुंदन फळारी व भाजप पक्षश्रे÷ाrंना सतर्क आणि सजक रहावे लागणार आहे. हे मात्र खरे.