Tarun Bharat

जैन धर्माचे संदेश आत्मसात करणे गरजेचे – आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

सद्याच्याकाळात जैन धर्माचे संदेश जास्तीतजास्त प्रसार करण्याची गरज असल्याचे मत ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी मुत्नाळ गावात भगवान श्री १००८ आदिनाथ तीर्थंकर जिनबिंब पंचकल्याण महामहोत्सव आणि भगवान श्री बाहुबलींच्या भव्य मूर्तीला महामस्तकाभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या समाजात शांती नांदायला हवी. जैन धर्माने दिलेल्या संदेशाला जाणून घेऊन शांती आणि अहिंसेला प्राधान्य दिले पाहिजेत.

सोंदामठाचे परमपूज्य भट्टारक भट्टाचार्य स्वस्ति श्री भट्टाकलंक स्वामी, कोल्हापूर येथील परमपूज्य भट्टारक पट्टाचार्य स्वस्ति श्री अभिनव लक्ष्मीसेन महास्वामी, मुत्नाळ केदार शाखापीठाचे ष. भ्र. श्री शिवानंद शिवाचार्य महास्वामी, रुद्रगौडा पाटील, पारिश पारिश्वाड, अडीवेप्पगौडा पाटील व जैन समुदायाचे प्रमुख उपस्थित होते.

Related Stories

एसीबीने तातडीने दोषारोप दाखल करावा

Amit Kulkarni

रुद्रस्वामी मठावर रथोत्सव हजारो भाविकांची उपस्थिती

mithun mane

देसूर-खानापूर रेल्वेमार्गावर स्पीड ट्रायल

Amit Kulkarni

उद्या विराट सायकल फेरी

Amit Kulkarni

कुडची नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

Patil_p

कॅन्टोन्मेंट हद्दीतील विद्यार्थ्यांनाही मिळणार लॅपटॉप

Amit Kulkarni