पुणे / प्रतिनिधी :
The minimum temperature will be higher in November देशाच्या बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यामध्ये किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला. त्यामुळे यंदा थंडीचा कडाका काहीसा कमी राहणार असला तरी, उन्हाची तीव्रताही फारशी जाणवणार नसल्याचे संकेत आहेत.
भारतीय हवामान विभागाने मंगळवारी नोव्हेंबर महिन्याचा अंदाज वर्तविला. त्यात नोव्हेंबर महिन्यातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र किनारपट्टी, मध्य प्रदेश, गुजरात, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्वोत्तर भारत, दक्षिण उत्तराखंड, जम्मू-काश्मीरच्या भागात यंदा किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. पूर्व उत्तर प्रदेश, उत्तर बिहार, राजस्थानचा बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
अधिक वाचा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर गॅस टँकर उलटला; तीन किलोमीटर परिसरात बंदी
कमाल तापमान घटणार
मध्य भारत, दक्षिण तसेच वायव्य भारतातील किमान तापमान हे सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानच्या भागात कमाल तापमान कमी राहील.
पूर्वोत्तर भारत तापणार
दरम्यान, पूर्वोत्तर भारतात कमाल तसेच किमान तापमान नोव्हेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने येथे गारवा कमी जाणवेल. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, बिहारचा काही भागातही कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील.
ईशान्य मोसमी पाऊस चांगला
नोव्हेंबरमध्ये दक्षिणेकडील भागात कोसळणारा ईशान्य मोसमी पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक 123 टक्के राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.