ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळी ईडीने छापा टाकला होता. त्यावेळी राऊतांच्या घरी 11.50 लाख रोकड सापडली. दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री उशिरा ईडीने राऊत यांना अटक केली. दरम्यान, ईडीने राऊतांच्या घरातून जप्त केलेल्या 11.50 लाख रुपयांचा हिशेब लागल्याचे एका संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
काल राऊतांच्या घरातून ईडीने 11.50 लाखांची रोकड जप्त केली होती. या पैशांचाहिशेब लागला आहे. 10 लाख हे पक्षाचे आहेत. त्या दहा लाखांवर एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख आहे. तर दीड लाख रुपये हे घरखर्चाचे आहेत. तशी नोंद त्या पैशांवर केलेली होती. राऊत यांच्या घरी ईडीने छापा टाकला त्यावेळी घरातील इतर सदस्यही उपस्थित होते. त्यामधील एका सदस्याने याची माहिती दिल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, राऊत यांच्या घरात सापडलेल्या या पैशांचा त्यांना हिशेब देता आला नव्हता. छापेमारीत त्यांच्या घरातून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. 11.50 लाख घरात कुठून आले? कसे आले? याची चौकशी ईडी करत आहे. जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन थोडय़ाच वेळात राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही!