विजेत्या धावपट्टूंना प्रोत्साहित करण्यासाठी सातारकर चौकाचौकात उभे
प्रतिनिधी/ सातारा
राजधानी साताऱयात 2022 ची सातारा हाफ हिल मॅरेथॉन ही तयार करण्यात आलेल्या वातावरणाने वेगळय़ा उंचीवर नेण्यात आली होती. स्पर्धकांना धावण्यासाठी एक एनर्जी मिळावी याकरता साऊंड सिस्टिमवर जी गाणी वाजवण्यात येत होती. त्या गाण्यांमुळे एक वेगळा फिल निर्माण झाला होता. तांडव या ढोल वादनांमुळे, पोलीस कवायत मैदानामुळे स्पर्धेलाच राजधानीचा माहोल तयार झाला होता. त्यामध्ये सुत्रसंचिकांचे अचुक संवाद कौशल्य धावपट्टूंना आणखी वेगाने धावायला प्रेरीत करत होते. कचऱयाचे छान असे नियोजन करण्यात आले होते.
साताऱयात 11 वी होत असलेली मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजनकर्त्यांनी नेटके नियोजन केले होते. स्पर्धेत कुठेही उणीव भासू नये याची काळजी आयोजकांच्यावतीने घेण्यात आली होती. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच वातावरण निर्मिती करण्यात आली होती. साऊंड सिस्टिमवरुनच सहभागी झालेल्या धावपट्टूंमध्ये एक चेतना जागवण्याचे काम आयोजकांच्यावतीने करण्यात आले होते. स्पर्धेला फ्लॅग ऑफ केल्यानंतर सर्व धावपट्टूंना सातारकरांच्यावतीने शुभेच्छा दिल्या. धावपट्टू परत पोलीस कवायत मैदानावर परतल्यानंतर त्यांचे त्याच जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा जयघोषात स्वागत करत त्यांच्या गळय़ात मेडल स्वयंसेवकांच्यावतीने देण्यात येत होते. कोणी धावपट्टूना थकल्यासारखे वाटल्यास लगेच त्यांना फिजिओथेरपीस्टकडे नेण्यात येत होते. तेथे त्यांना फिजिओथेरपी दिली जात होती. धावून आलेल्या रनरंचा आणखी उत्साह वाढवण्यासाठी पोलीस कवातय मैदानामध्ये तांडव ढोल वादन सुरु होते. तर दुसऱया बाजूला सुत्रसंचालिकाच सुत्रसंचालनामधून प्रोत्साहित करत होत्या. त्यात स्पर्धेच्या शेवटचा धावपट्टू मैदानाजवळ पोहचेपर्यंत पाऊस थांबला होता. त्यानंतर पावसाने रिमझिम सुरुवात केली. त्यामुळे एक वेगळाच माहोल तयार झाला होता.
फिजीओथेरपीस्ट चांगल्या दर्जाचे
रनरंना धावून आल्यानंतर काहींना पाय जड झाल्यासारखे वाटत होते. काहींना तर पायामध्ये भान राहिले नव्हते. अशा रनरंना लगेच बाजूला टेंट करण्यात आले होते. तेथे नेणून महालक्ष्मी फिजिओथेरपी आणि कृष्णा चॅरिटेबल्सचे फिजिओथेरपीस्टचे फिजिओथेरपी करत होते. थंड पाण्याच्या गोळय़ाने शेक देत होते. वेगवेगळय़ा प्रकारचे व्यायाम करुन घेत होते.
मैदानात भेटले सख्खे मित्र
ठाणे येथील आयटी कंपनीत काम करत असलेले संदेश जाधव सातारा हिल मॅरेथॉनला आर्वजून येतात. त्याचे मित्र जुबेर खान आणि वृध्दांच्या टीममध्ये प्रथम पटकावलेले केशव मोठे हे बऱयाच दिवसांनी साताऱयाच्या मॅरेथॉनमध्ये एकत्र भेटले. त्यांनी वीन केल्याबद्दल कडकडून मिठी मारत मैदानातच आनंद व्यक्त केला.
सातारा जिल्हा परिषदेचे अधिकारी धावले
सातारा जिल्हा परिषदेचे पूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे हे स्वतः मॅरेथॉनपट्टू होते. ते सहभागी होत होते. याही मॅरेथॉनमध्ये सातारा जिह्याचे असलेले मुख्य लेखाअधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, कोरेगावच्या गटविकास अधिकारी क्रांति बोराटे, बांधकामचे अभियंता प्रशांत खैरमोटे हे सातारा जिह्यातीलच असल्याने त्यांनी या स्पर्धेत केवळ सहभागी न होता. अंतर पुर्ण केले. त्यामध्ये विकास सावंत यांनी 2 तास 11 मिनिटे 59 सेकंदात पुर्ण केले. खैरमोडे यांनी 2.40 मिनिटे तर क्रांति बोराटे यांनी सराव न करता सुमारे 3 तासात अंतर पूर्ण केले.
ग्रामीण भागातील धावपट्टूंचा मोठा सहभाग
ग्रामीण भागातील धावपट्टूंचा सहभाग वाढावा हा उद्देश असल्याने ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणावर नोंदणी झाली होती. ग्रामीण भागातील धावपट्टूंनी विक्रमी वेळेत अंतर पार केले. त्यांच्या सहभागाबद्दल त्यांचे कौतुकही आयोजकांच्याकडून करण्यात आले.
पोलीस कवायत मैदानावर कचरा शिल्लक नव्हता
आयोजकांच्यावतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. पोलीस कवायत मैदानावर सुमारे 8 हजारहून अधिक लोक जमले होते. त्यांच्या नाष्टय़ाकरता, पाण्याकरता सोय करण्यात आली होती. ती संयोजक योग्य पद्धतीने सोय करताना दिसत होते. परंतु खेळाडूंना मिळालेली रिप्रेशमेंटचे कागद मैदानात खाली कुठेही पडल्याचे दिसत नव्हते. कचरा टाकला जात नव्हता आणि कोणाकडून पडला तर तो उचलून डसबीनमध्ये टाकला जात होता त्यामुळे संपूर्ण मैदान स्पर्धेनंतरही चकाचक राहिले होते.
नैनातलच्या महिला धावपट्टू मनिषा जोशी यांची विजयी घौडदौड
गतवेळी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकावर महिलांमध्ये असलेल्या नैनीतालच्या मनिषा जोशी यांनी याही वर्षी सहभाग नोंदवत यावर्षी तृतीय क्रमाक पटकावला. त्यांनी स्मित हास्य करत पुन्हा पुढच्या मॅरेथॉनमध्ये आपण प्रथम क्रमांक पटकवण्यासाठी प्रयत्न करु असा विश्वास पत्रकारांजवळ व्यक्त केला.