नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीचा (Gujrat Election ) निकाल अपेक्षित लागला असला तरी त्यातून देशाचा मूड दिसून येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवारी गुजरातमध्ये विक्रमी विजय मिळवला आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी आपरली प्रतिक्रिया दिली. गुजरात राज्याच्या 182 विधानसभा जागांपैकी 155 जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले, “गुजरातचा निकाल अपेक्षित होता, कारण केंद्राची एक ताकदवान यंत्रणा एका विशिष्ट राज्यामध्ये प्रकल्प हलवण्यासाठी वापरली गेली आणि त्यातूनच हा निकाल पुढे आला.” पुढे बोलताना शारद पवार म्हणाले, “गुजरातचा निकाल हा देशाचा मूड दर्शवत नाहीत. दिल्ली आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या नागरी निवडणुकांचे निकाल हे सिद्ध करत आहेत, या दोन्हा ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे,” असे ते म्हणाले. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने (आप) दिल्ली महापालिकेतील भाजपची १५ वर्षांची सत्ता संपवली.

