पाण्यात उडी घेताच जातो जीव
जगभरात अनेक धोकादायक नदी आणि सरोवरं आहेत. असेच एक सरोवर जगातील सर्वात धोकादायक सरोवर मानले जाते. या सरोवरात गोठलेल्या अवस्थेत प्राण्यांचे मृतदेह दिसून येतात. या धोकादायक परंतु सुंदर सरोवराचे नाव नेट्रॉन असून ते टांझानियात आहे. अरुशा क्षेत्राच्या उत्तर नागोरोंगोरो जिल्हय़ात असलेल्या नेट्रॉन सरोवराला मिठाचे सरोवर किंवा क्षारयुक्त सरोवरही म्हटले जाते. या सरोवराच्या संपर्कात येणारा जीव मृत्युमुखी पडत असल्याचे सांगण्यात येते.


न्यूट्रॉन सरोवरात कुठल्याही भीतीशिवाय फ्लेमिंगोच विहार करू शकतात. या सरोवराच्या पाण्यात पीएचचे प्रमाण जवळपास 12 इतके आहे. हे प्रमाण घरगुती ब्लीचइतके असते. या सरोवराच्या प्राण्यात शिकारी जीव अधिक काळ जिवंत राहू शकत नाहीत.
एका ज्वालामुखीमुळे या सरोवराचे पाणी खारट आहे. हा ज्वालामुखीतून अजब लाव्हारस म्हणजेच नॅट्रोकार्बोनाइट बाहेर पडते. मिठाच्या सरोवरानजीक पर्वतांवरून सोडियम कार्बोनेट आणि अन्य खनिजांमध्ये नॅट्रोकार्बोनाइट मिसळले गेल्याने पाणी खारट झाले आहे. या सरोवराच्या पाण्यात पीएचचे प्रमाण अधिक असल्याने बहुतांश प्राण्यांची त्वचा आणि डोळे जळून जातात. तसेच अधिक वेळ पाण्यात राहिल्यास प्राण्याचा मृत्यू ओढवतो.
फ्लेमिंगोंची त्वचा अधिक कठोर असल्याने या पाण्याचा त्याच्यावर प्रभाव पडत नाही. परंतु मानवी त्वचा नरम असते. कधीकधी 60 अंश सेल्सिअसपर्यंत या सरोवराचे पाणी तप्त होते. या सरोवराच्या पाण्यात जितका वेळ माणूस थांबेल, तितकाच तो जळतो. परंतु पावसाळय़ात पीएचचे प्रमाण तेथे बदलत राहते.