Tarun Bharat

बोलिवियात सर्वात धोकादायक रस्ता

Advertisements

येथे किंचित चूकही देऊ शकते मृत्यूला निमंत्रण

मध्य अमेरिकन देश असलेल्या बोलिवियातील 69 किलोमीटर लांबीचा नॉर्थ युंगास रोड जगातील सर्वात धोकादायक रस्ता मानला जातो. येथे ड्रायव्हिंग इतके धोकादायक आहे की याला ‘डेथ रोड’ म्हटले जाते. या रस्त्यावरून प्रवास करण्याचा आनंद केवळ सायकलपटूच घेऊ शकतात. या रस्त्यावर होणाऱया दुर्घटनांमुळे दरवर्षी 200-300 जणांचा मृत्यू होतो. बहुतांश दुर्घटना ओव्हरलोड आणि स्लिप झाल्याने होत असतात.

हा रस्ता अत्यंत निसरडा असल्याने येथे ड्रायव्हिंगदरम्यान वाहनांचे टायर्स खोल दरीच्या दिशेने स्लिप करत असतात. या रस्त्यावरील चढाव अरुंद आणि धोकादायक आहेत. अनेक ठिकाणी तर दोन कार्स एकमेकांना क्रॉस करू शकत नाहीत. हा रस्ता समुद्रसपाटीपासून 15,400 फुटांच्या उंचीवर आहे. येथे दरवर्षी 200 ते 300 जणांचा मृत्यू होत असतो.

अनेकदा तर वाहनांचा एक टायर खाली लटकलेला असतो, अशा स्थितीत अत्यंत सावधपणे त्याला बाहेर काढावे लागते. अनेक वाहने तर शेकडो फूट खोल दरीत कोसळतात. धोक्यांना सामोरे जाणाऱया ऍव्हेंचरर्स रायडर्ससाठी हे पसंतीचे ठिकाण आहे. 2006 मध्ये कोरोइको येथून ला पाज येथे जाण्यासाठी नॉर्थ युंगास रोड हाच एकमेव पर्याय होता. 1930 मध्ये चाको युद्धादरम्यान पराग्वेच्या कैद्यांनी या रस्त्याची निर्मिती केली होती.

Related Stories

या कापडाचे आहेत कान

Patil_p

60 टक्के रशियन क्षेपणास्त्रे वाया !

Patil_p

चीनकडून ऑस्ट्रेलियासोबतचे सर्व व्यापार करार स्थगित

Amit Kulkarni

हिंसा न थांबल्यास सैन्य तैनात करू

Patil_p

इम्रान खान गच्छंतीच्या मार्गावर

Amit Kulkarni

जर्मनीत टाळेबंदीला तीव्र विरोध

Patil_p
error: Content is protected !!