4.05 कोटी रुपयांमध्ये विक्री
जगातील हजारो-लाखो लोक स्वतःच्या जीवनभराची कमाई केवळ घर बांधणी अन् वाहनखरेदीत गुंतवत असतात. यासाठीचा आनंद मिळविण्यासाठी ते अनेक वर्षांपर्यंत सातत्याने मेहनत करतात. परंतु जगाता काही अशा मूल्यवान गोशटी आहेत, ज्यांच्यासमोर हे सर्व अत्यंत सुक्ष्म भासू लागते. काहीजण मद्य किंवा बियर पिण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असतात. परंतु जगात एक अत्यंत महागडी बियर असून त्याची किंमत जाणून घेतल्यावर धक्काच बसतो.
बियरच्या एका बाटलीने जगभरातील लोकांना अचंबित करून साडले आहे. अखेर बियर इतकी महाग का असा प्रश्न त्यांना पडला आहे. जगातील सर्वात महागडय़ा बियरचा मान 140 वर्षांपेक्षा अधिक जुन्या एका बॉटलच्या नावावर असून तिला ‘ऑलसॉप्स आर्क्टिक एले’ नावाने ओळखेल जाते. या बियरच्या बाटलीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून त्याला एका आर्टिफॅक्टच्या शेणीत ठेवण्यात आले आहे.
या बियरमध्ये काही विशेष गुण देखील आहेत. ओक्लाहोमा येथील एका खरेदीदाराने 2007 मध्ये ऑलसॉपच्या आर्क्टिक एलेची एक बॉटल 304 डॉलर्समध्ये खरेदी केली होती. बॉटलच्या एका जुन्या लॅमिनेटेड कागदावर हातावर पर्सी जी बोल्स्टर यांनी स्वाक्षरी केली होती. पर्सी जी बोल्स्टर यांना ही बॉटल 1919 मध्ये परत मिळाली होती असे या कागदावर नमूद होते. ही बियर विशेष स्वरुपात 1852मध्ये एका पोलर एक्सपीडिशनसाठी तयार करण्यात आली होती. आर्क्टिक सागराच्या माध्यमातून अटलांटिक आणि प्रशांत महासागरांदरमन एक मार्गात दोन जहाजांकडून धोकादायक सागरी यात्रेद्वारे ईरेबस आणि त्यांच्या कर्मचाऱयांना शोधण्यासाठी पाठविण्यात ओलल्या बचावपथकाला ही बियरची बाटली सापडली होती.
1852 मध्ये आर्क्टिक एले हे म्युझियम क्वालिटी ऑलसॉपचे होते. हे म्युझियम सीलपॅक आणि बाटल्यांनी भरलेले होते. यामुळे ही बियरची बाटली जगात उपलब्ध सर्वात दुर्लभ बियर ठरली आहे. एका वेबसाइटवर कथितपणे याकरता 157 हून अधिक बोली लागल्या होतय. परंतु अखेरीस एका खरेदीदाराने सुमारे 4.05 कोटी रुपयांमध्ये ती खरेदी केली आहे.