केवळ 1 ग्रॅमची किंमत हजारो कोटींमध्ये
एक सामान्य माणूस जर काही हिरे-प्लॅटिनम किंवा सोन्याचांदीचे दागिने खरेदी करत असल्यास त्याला तो सर्वात महाग धातू वाटू लागते. परंतु सर्वात महाग पदार्थ कुठला आणि त्याची किंमत काय याचे उत्तर जाणून घेतल्यावर धक्काच बसतो.
जगातील सर्वात महाग पदार्थ कुठला याचा विचार करत असताना हिरे किंवा प्लॅटिनम नजरेसमोर येते, परंतु एका पदार्थाच्या एक गॅमची किंमत अनेक देशांच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या मूल्यापेक्षाही अधिक आहे. बहुतांश लोकांनी या धातूचे नाव ऐकले नसते, परंतु ‘एंटीमेटर’ म्हणजेच ‘प्रतिपदार्थ’ नावाचा धातू जगातील सर्वात महागडा पदार्थ आहे.
एंटीमेटर म्हणजेच प्रतिपदार्थाला जगातील सर्वात मूल्यवान पदार्थ मानले जाते. नासानुसार याच्या एका ग्रॅमची किंमत 62.5 ट्रिलियन डॉलर म्हणजे 5000 अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे. हा अन्य धातूंप्रमाणे खाणीत मिळत नाही, तर प्रयोगशाळेत तयार होत असतो. याच्याबद्दल अंतराळजगतातून कळले होतो. कृष्णविवरांमध्ये तारे दोन हिस्स्यांमध्ये तुटल्यामुळे हा धातू निर्माण होतो आणि यात अमर्यादित ऊर्जा असते. याला सर्नच्या प्रयोगशाळेत पहिल्यांदा तयार करण्यात आले होते. याचे प्रमाण तेवळ 10 नॅनोग्रॅमपेक्षाही कमी होते. याच्या निर्मितीकरता अत्यंत अधिक खर्च येत असतो.
वैज्ञानिक या पदार्थावर संशोधन करत आहेत. हा पदार्थ अनेक कारणांसाठी वापरला जाऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रात विशेषकरून कर्करोगावरील उपचारात एंटीमेटरचा वापर केला जाऊ शकतो. साधारण इंधनाच्या तुलनेत एंटीमेटरच्या ऊर्जेची तीव्रता खूपच अधिक असल्याने याचा वापर रॉकेट इंधन म्हणून केला जाऊ शकतो. परंतु याची निर्मिती करणे सोपे नाही.