Tarun Bharat

सर्वात महागडी नेल पॉलिश

केवळ 25 जणच करू शकतात खरेदी

ब्यूटी अँड ग्रूमिंग मार्केटमध्ये अत्यंत महागडी उत्पादने असतात. यातील छोटी बॉटल किंवा पॅक खरेदी करताना देखील तुमचा खिसा रिकामी होऊ शकतो. परंतु मुलींना अशा उत्पादनांचा वापर करणे आवडते. याचमुळे या उद्योगक्षेत्रात कमाई देखील मोठी आहे.  एका छोटय़ा नेल पेंटची बॉटल सहजपणे 300-350 रुपयांमध्ये उपलब्ध होते. परंतु एका नेल पॉलिशची किंमत ऐकून धक्काच बसतो. सौंदर्य प्रसाधनांची किंमत हजारो रुपयांमध्ये असणे नवी बाब नाही. कारण सद्यकाळात चांगल्या ब्रँड्सच्या उत्पादनांची किंमत शेकडोंपासून हजारो रुपयांमध्ये असते. परंतु एखादे उत्पादन लाखो किंवा कोटय़वधी रुपयांमध्ये विकले जात असेल तर निश्चितच आश्चर्य व्यक्त होईल. एका नेल पॉलिशची किंमत 2.5 लाख डॉलर्स म्हणजेच 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

अमेरिकन डिझाइनरकडून निर्मिती

जगातील सर्वात महागडय़ा नेल पॉलिशचे नाव ऐजाटुर आहे. लॉस एंजिलिसमधील डिझाइन ऐजाटुर पोगोसियन यांनी ही नेल पॉलिश तयार केली आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक नेल पॉलिश तयार केल्या आहेत, परंतु त्यांनी तयार केलेली काळय़ा रंगाची नेल पॉलिश ऐजाटुर जगातील सर्वात महागडी ठरली आहे. ही नेल पॉलिश खरेदी करणे सर्वांना शक्य नाही. कारण याच्या किमतीत 3-4 आलिशान कार खरेदी करता येतील किंवा दिल्ली-मुंबईसारख्या ठिकाणी एक लक्झरी फ्लॅट खरेदी करता येतो.

इतकी महाग का?

ऐजाटुर ब्लॅक नेल पॉलिश तयार करण्यासाठी 267 कॅरेटच्या ब्लॅक डायमंडचा वापर करण्यात आला आहे. याचमुळे याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. ऐजाटुरच्या एक ब्लॅक नेल पॉलिशची बॉटल 150 मिलिमीटरची आहे. ही नेल पॉलिश आतापर्यंत केवळ 25 जणांनाच खरेदी करता आली आहे.

Related Stories

आमिरसोबत काम करणार नागार्जुनचा पुत्र

Patil_p

गुन्हेगाराशी दोन हात करणारा किंग्ज मॅन

Patil_p

दिग्दर्शक संजय जाधव यांची प्लॅनेट टॅलेंटमध्ये एन्ट्री

Patil_p

आजारपणानंतर चित्रिकरणात सामील समांथा

Patil_p

फूड डोनेशन मोहिमेत मृणालचा सहभाग

Amit Kulkarni

फास्ट 10’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p