किंमत जाणून व्हाल दंग
भारतात पिकविला जाणारा बासमती तांदूळच सर्वात महागडय़ा तांदळापैकी एक असल्याचे तुम्ही आतापर्यंत मानत असाल. परंतु जगात एक असा देश आहे, जेथे प्रचंड उष्णता आणि वाळवंटी भागात भातपिक घेतले जाते. परंतु हे भात पीक अशा देशात घेतले ज्याबद्दल जाणून घेतल्यावर प्रथमदर्शनी तुमचा विश्वासच बसणार नाही.
हसावी तांदळाचा दर 50 सौदी रियाल प्रतिकिलो इतका आहे. भारतीय चलनात हा दर रुपांतरित केल्यास याची किमंत 1 हजार ते 1100 रुपये प्रतिकिलो इतकी होते. परंतु काही हसावी तांदूळ सरासरी दर्जाचे असतात, ज्यांना लोक 30-34 रियाल (800 रुपयांच्या आसपास) मध्ये देखील खरेदी केला जातो. इतक्या रकमेत भारतात एका व्यक्तीचे महिन्याभराचे धान्य खरेदी करता येते.


सौदी अरेबियात भीषण उष्णतेत लागवड आणि मग वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कापणी सुरू होते. या तांदळाचा रंग लाल असतो आणि लोक याला रेड राइस देखील म्हटले जाते. सौदी अरेबियात या तांदळाचा वापर बिर्याणी तयार करण्यासाठी केला जातो.
हा भात खाल्यावर वृद्धांमध्ये ऊर्जा संचारत असल्याचे सांगण्यात येते. याची लागवड भारतातील शेतीप्रमाणेच केली जाते, परंतु याकरता अत्यंत अधिक श्रम आणि देखभालीची गरज असते. हे पीक 48 अंश सेल्सिअस तापमानात घेतले जाते आणि येथील शेख लोकांना हा तांदूळ अत्यंत पसंत आहे. वाळवंटात तयार होणारा हा तांदूळ अत्यंत स्वादिष्ट आणि पोषकघटकांनी युक्त असतो. जगभरातील श्रीमंत लोक याचा आहारात समावेश करत असतात.