Tarun Bharat

अमेरिकेकडून मिळणार सर्वात घातक तोफ

Advertisements

युद्धाचे चित्र पालटण्याची क्षमता : भारतीय सैन्याकडून देखील वापर

रशियाविरोधातील युद्धात मागील 69 दिवसांपासून पूर्ण शक्तिनिशी प्रतिकार करणाऱया युक्रेनच्या सैन्याला आता अमेरिका ‘युद्धाचा बादशाह’ म्हणवून घेणारी स्वतःची घातक तोफ एम777 देणार आहे. अमेरिका युक्रेनला एकूण 90 एम777 तोफा पुरविणार आहे. अमेरिकेच्या या तोफा युक्रेनच्या सैन्यात सामील झाल्यावर रशियाच्या सैन्याला खुल्यात जागेत येणे अधिकच अवघड ठरणार आहे. एवढेच नाही तर या तोफांच्या मदतीने युक्रेनचे सैन्य रशियाने बळकावलेल्या क्षेत्रावर पुन्हा नियंत्रण मिळवू शकते. भारतीय सैन्य देखील चीन सीमेवर याच तोफांचा वापर करत आहे.

युक्रेनला आतापर्यंत 155 एमएमच्या 70 एम777 तोफा आच्णि 70 हजार तोफगोळे पुरविण्यात आले आहेत. युक्रेनच्या 200 सैनिकांना या तोफांचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण अमेरिकेकडून देण्यात आले आहे. पुढील काळात आणखीन 50 युक्रेनियन सैनिकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. युक्रेनच्या तोफखाना रेजिमेंटच्या पहिल्या तुकडीला कॅनडाचे सैनिक प्रशिक्षण देत आहेत. याचबरोबर अमेरिकेचे नॅशनल गार्ड्स या तोफांसाठी प्रशिक्षण देत आहेत. रशियाच्या हल्ल्यापूर्वी युक्रेनमध्ये प्रशिक्षण देत होते.

अमेरिकेचे नॅशनल गार्ड्स आता जर्मनीमध्ये युक्रेनच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. ड्रोन आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या या काळात देखील तोफा युद्धात विध्वंस घडवून आणण्यात पुन्हा उपयुक्त ठरल्या आहेत. या तोफांना नेहमीच ‘युद्धाचा बादशाह’ म्हटले जात राहिले आहे. फायरिंग सुरू झाल्यावर या तोफेच्या हल्ल्यातून बचावाची कुठलीच संधी मिळत नसल्याचा दावा अमेरिकेचे मरीन कर्नल जेम्स डब्ल्यू प्रे यांनी केला आहे.

तोफांद्वारे कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही हवामानात हल्ला करता येतो. या तोफांच्या मदतीने युक्रेनचे सैन्य रशियाच्या आक्रमणाच्या क्षमतेला कमजोर करू शकते. या युद्धात युक्रेनची जमीन आता दलदलयुक्त असल्याने रशियाचे सैन्य पुढे सरकण्यासाठी रस्त्यांचाच वापर करणार आहे. युक्रेनचे सैन्य ड्रोन आणि अन्य टेहळणी उपकरणांद्वारे रशियाच्या सैनिकांच्या हालचाली टिपू शकते आणि गरज भासल्यास तोफांच्या मदतीने जोरदार हल्ला चढवू शकत असल्याचे प्रे यांचे म्हणणे आहे.

एम777 तोफांची जबरदस्त क्षमता पाहता भारतीय सैन्याने देखील 5 हजार कोटी रुपयांमध्ये 145 तोफांची ऑर्डर अमेरिकेला दिली होती. 30 किलोमीटरपर्यंत मारा करू शकणाऱया तीन एम-777 रेजिमेंटला चीनसोबतच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे. चीन सीमेवरील तोफांची तैनाती वाढविण्याची देखील तयारी आहे. चिनूक हेलिकॉप्टरद्वारे या तोफा सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेता येतात.

Related Stories

वधू निघाली चक्क बहिण

Patil_p

श्वानांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध पूल

Patil_p

युद्धादरम्यान दिसली मस्क यांची ‘पॉवर’

Patil_p

66 लाख कोटींचे पॅकेज

Patil_p

तासात 249 कप चहा तयार

Amit Kulkarni

भारताशी सहकार्य बळकट करणार

Patil_p
error: Content is protected !!