तरीही कोटय़वधींमध्ये विकण्यास तयार
स्वतःचे एक घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. काही जणांना शहरात राहणे आवडते, तर काही जण शांत भागांमध्ये राहण्यास प्राधान्य देतात. अनेकदा तर मनाजोगे घर शोधणे अत्यंत अवघड असते. जगात सर्वात एकाकी म्हणून ओळख असणारे घर आता कोटय़वधींमध्ये विकले जाणार आहे.
हे घर अमेरिकेतील वोहोआ बेमधील एका बेटावर निर्माण करण्यात आले ओ. या घरात केवळ एक बेडरुम आहे. या घराच्या आसपास कुणीच राहत नाही. जर कुणाला फॅन्सी लाइफस्टाइल जगायची असल्यास त्याच्यासाठी हे घर उत्तम आहे.
हे घर समुद्रकिनाऱयावर असून या एकच बेडरुम असलेल्या घरासमोर वाळू आणि पाण्याशिवाय काहीच नाही. या घरासाठी 2.58 कोटी रुपयांची किंमत निर्धारित करण्यात आली आहे. या घरातून बाहेर पडताच कुठलाच मनुष्य दिसून येणार नाही, केवळ आणि केवळ निसर्गाची साथ मिळणार आहे.
हे घर 2009 मध्ये तयार करण्यात आले होते. येथे जबरदस्त वायफाय नेटवर्क असून गरजेची सर्व सामग्री या घरात आहे. लाकडी भिंतीने तयार केलेले हे घर अत्यंत सुंदर आहे. समुद्रकाठावर असलेल्या घरात कुठलेच बाथरुम नाही.