Tarun Bharat

जगातील सर्वात अनोखा देश

Advertisements

राहतात केवळ 27 लोक, 2 फ्लॅट इतकीच जागा

एका छोटे किनारी प्लॅटफॉर्म सीलँड जगातील सर्वात छोटा देश म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त असलेला व्हॅटिकन सिटी हा देश खऱया अर्थाने सर्वात छोटा देश आहे. परंतु सीलँड एक मायक्रोनेशन असून त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त नाही. हा जगातील एकमेव असा देश आहे, जेथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

येथील युवराज मायकल बेट्स आहेत. 2 सप्टेंबर 1967 रोजी याला मायक्रोनेशन म्हणून घोषित करण्यात आले होते. याचे क्षेत्रफळ एकूण 0.004 चौरस किलोमीटर इतकेच आहे. येथील कथित चलन सीलँड डॉलरचे नाणे असून स्वतःचे पोस्ट तिकीट देखील आहे. सीलँडची निर्मिती दुसऱया महायुद्धादरम्यान इंग्रजांकडून करण्यात आली होती. याचा वापर सैन्य आणि नौदलाचे बंदर म्हणून केला जात होता. ब्रिटनच्या हद्दीबाहेर असलेले सीलँड युद्ध समाप्त झाल्यावर नष्ट करण्याचा विचार होता, परंतु तसे करण्यात आले नव्हते.

दुसऱया महायुद्धादरम्यान 1943 मध्ये ब्रिटन सरकारकडून एचएम फोर्ट रफ्सची निर्मिती मॉनसेल फोर्ट्स म्हणून करण्यात आली होती. मॉनसेल फोर्ट्सचा वापर प्रामुख्याने महत्त्वपूर्ण शिपिंग लेन्सच्या विरोधात बचावाच्या स्वरुपात करण्यात येत होता. जर्मन माइन-लेइंग एअरक्राफ्टच्या विरोधात देखील ते उपयुक्त होते. या मॉनसेल फोर्ट्सना 1956 मध्ये बंद करण्यात आले होते.

1967 मध्ये सीलँडवर पॅडी रॉय बेट्सचा कब्जा होता. त्यांनी याला एक सार्वभौम देश म्हणून घोषित केले होते. मागील 54 वर्षांपासून हे ब्रिटन सरकारच्या अवहेलनेचे काम करत आहे. परंतु सीलँड एक वादग्रस्त मायक्रोनेशन आहे. सफॉकच्या किनाऱयापासून ते केवळ 12 किलोमीटर अंतरावर आहे.

ब्रिटिश सरकारचा विरोध

1968 मध्ये ब्रिटिश कामगारांनी स्वतःच्या नौवहन सेवेसाठी सीलँडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. बेट्सने हवेत गोळीबार करत त्यांना इशारा दिला होता. गुन्हा 3 सागरी मैल अंतराबाहेर घडल्याने बेट्सवर कारवाई करणे ब्रिटनला शक्य झाले नव्हते. बेट्सने सीलँडमध्ये चलन, पासपोर्टसह एक राज्यघटना, राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीतही सादर केले आहे. सध्या तेथे केवळ 27 लोक राहत आहे. तर जागा केवळ दोन टेनिस कोर्टइतकीच आहे.

Related Stories

ताजमहालचे दर्शन अधिकच महाग

Patil_p

बेघर व्यक्तीचे अनोखे मांजर प्रेम

Patil_p

या छायाचित्राने मनचं जिंकलं

Rohan_P

हे पाहून तुम्हीही सलाम कराल

Patil_p

लाखो वर्षे जुन्या गुहेत रेस्टॉरंट

Amit Kulkarni

गव्हाच्या शेकडो दाण्यांनी साकारले ‘अटल’जीं चे भव्य रेखाचित्र

Rohan_P
error: Content is protected !!