10 वर्षापासून होते बिगर गोमंतकीयांचे वास्तव्य
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा कदंबा बसस्थानकामागील तसेच पेट्रोल पंपाजवळील सीटी बाजारच्या मागील भागात अनेक वर्षापासून झोपडय़ा थाटून बिगर गोमंतकीय नागरिक 14 झोपडय़ांमध्ये वास्तव्य करीत होते. या झोपडय़ा हटविण्याबाबत स्थानिकांतून पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. या तक्रारीच्या आधारावरच मुख्याधिकारी सीताराम सावळ यांच्या आदेशानुसार सोमवारी या झोपडय़ा हटविण्यात आल्या.
मुख्याधिकारी सावळ यांनी पालिका निरीक्षक नरसिंह राठवड, शेखर गावस व सोनाली पेडणेकर यांना झोपडय़ा हटविण्याचा आदेश देताच जेसीबीच्या सहाय्याने त्या पाडण्यात आल्या. झोपडय़ा हटविताना बिगरगोमंतकीय कुटुंबानी अधिकाऱयांना हटवू नये याबाबत विनंती व गयावया केली. परंतु आदेश असल्यामुळे या झोपडय़ा पालिकेने हटविल्या.