Tarun Bharat

सुधीरचे मरण; कौटुंबिक कारण!

Advertisements

खून कौटुंबिक कलहातूनच : पत्नी, मुलगीसह मित्राला अटक


प्रतिनिधी / बेळगाव

कौटुंबिक वादातूनच कॅम्प येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वी संशयित आरोपीला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात खून झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिकाची पत्नी आणि मुलीचाही सहभाग असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे बेळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून वरि÷ अधिकाऱयांनी त्यांचे कौतुक केले
आहे.

सुधीर भगवानदास कांबळे (वय 57, रा. मद्रास स्ट्रीट कॅम्प) असे खून झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिकाचे नाव आहे.

सुधीर हे फिशमार्केट जवळील इमारतीच्या तिसऱया मजल्यावर आपल्या कुटुंबियांसह राहत होते. शुक्रवार दि. 16 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता ते आपल्या खोलीत झोपले होते. शनिवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता खून झालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून कॅम्प पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

पत्नी रोहिणी सुधीर कांबळे (वय 50), मुलगी स्नेहा सुधीर कांबळे (वय 28, दोघीही रा. मद्रास स्ट्रीट कॅम्प), अक्षय महादेव विटकर (वय 34, रा. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खून झाल्यानंतर कॅम्प पोलिसांनी तपासाचे चपे फिरविली होती. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, पीएसआय एस. एस. पुजारी, बी. आर. डुग, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुमन पवार, किरण होनकट्टी, कॅम्पचे पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर तळवार, संतोष बरगी यांनी या प्रकरणाचा छडा लावला.

खून झाला त्यावेळी सुधीर यांची पत्नी व मुले घरातच होती. ते आपल्या बेडरुममध्ये झोपले होते. सुधीर यांच्या हातावर, छातीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला होता. जिन्यावर व बाथरुममध्ये रक्ताचे डाग पडले होते. सुधीर यांचा मोठा भाऊ अरुण भगवानदास कांबळे (वय 58) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यानंतर तपासाची चपे फिरविली. या प्रकरणामध्ये घरातीलच कोणी तरी गुंतले असल्याची दाट शक्मयता व्यक्त होत होती. त्यानुसार पत्नी व मुलीची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुह्याची कबुली दिली.

मयत सुधीर यांची मुलगी स्नेहा ही पुण्याला कामाला होती. त्या ठिकाणी संशयित आरोपी अक्षय याची तिच्याशी ओळख झाली. खून करण्यापूर्वी तो बेळगावातच होता. त्याची एका हॉटेलमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. ज्या दिवशी खून झाला, त्या दिवशी तो काही वेळ कॅम्प येथील घरामध्ये येऊन गेला. त्यानंतर या तिघांनी मिळून सुधीर यांचा खून केला. खून केल्यानंतर अक्षय हा पुन्हा पुण्याला गेला होता. या प्रकरणात तोही जखमी झाला होता. पुणे येथील खासगी हॉस्पिटलामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पुणे येथून अटक केली.

गूढ होते कायम

कौटुंबिक वादातून हा खून झाला. बेडरुममध्ये झोपलेल्या अवस्थेत सुधीर यांचा खून झाला असला तरी रक्त मात्र बाथरुमपर्यंत पडलेले दिसल्यामुळे यामध्ये आणखी कोणी तरी जखमी झाल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून यामध्ये जखमी झालेल्या आरोपीलाही अटक केली आहे. अटकेतील या तिघांकडून खुनासाठी वापरलेली शस्त्रsही जप्त करण्यात आली आहेत.

Related Stories

गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱयांना पोलीस अधिकाऱयांकडून मार्गदर्शन

Patil_p

अन् मृत्यू समोर होता…

Omkar B

वेदांत सोसायटीतर्फे राजेशकुमार मौर्य यांचा सत्कार

Amit Kulkarni

आमच्या घरांना जाण्यास रस्ता उपलब्ध करा

Patil_p

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱयांना समान वेतन द्या

Amit Kulkarni

सीईटीवर राहणार सीसीटीव्हीची नजर

Amit Kulkarni
error: Content is protected !!