Tarun Bharat

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गुढ अद्याप कायम

कॅफेच्या टेरेसवरून मारली उडी ः उंचावरून पडून डोक्याला मार लागल्याची पोलीस ठाण्यात नोंद

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील भवानी पेठेत राहत असलेली 16 वर्षीय श्रेया रासणे ही रविवारी मित्राच्या वाढदिवसासाठी इरोज कॅफेत आली होती. वाढदिवस साजरी झाल्यानंतर तिसऱया मजल्याच्या खिडकीतून खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नक्की काय झाले, ती पडली का तिने आत्महत्या केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. यामुळे तिच्या मृत्यूचे गुढ अद्याप  कायम आहे. पोलिसांनी ती उंचावरून पडल्याने डोक्याला मार लागून मयत झाल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

    शहरातील एका नामाकित शाळेत शिक्षण घेत असलेली श्रेया रासणे ही रविवारी आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी इरोज कॅफेत साजरी करत होती. वाढदिवस साजरी करताना तिच्या मित्र परिवाराला क्षणभर ही वाटले नसले की, ती काही तासात हे जग सोडून जाईल. मित्राच्या आनंदात ती आनंदी होती. परंतु काही तासांनी वाढदिवस संपून ती घरी जायला निघाली. इतक्यात कॅफेच्या तिसऱया मजल्याच्या खिडकीत ती जाऊन बसली. श्रेया आपल्यासोबत नाही ही बाब तिच्या एका मित्राच्या लक्षात आली. त्याने तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. इतक्यात ती खिडकीत बसलेली दिसली. तो तिच्यापर्यंत पोहचला होता तोच तिने खिडकीतून खाली उडी मारली. हे पाहून त्याने तिचा पाय पकडून ठेवला.

 तिला वाचवण्यासाठी तो धडपडत होता. त्याने आरडाओरडा केला पण काही मदत मिळण्याआधीच ती वरून खाली पडली. या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचले. परंतु तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून तिच्या मृत्यूमुळे आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूचे कोणतेही ठोस कारण समोर न आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  

उडी मारली की, पडली

शेया हिचा तिच्या जवळील एका मित्रासोबत सतत वाद होत असत. ही बाब तिच्या मित्र परिवारालाही माहिती होती. वाढदिवसाच्या दिवशीही याच मित्रासोबत काही वाद झाल्याने ती तणावात होती. यातून तिने उडी मारली आणि जीव दिला असा संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. परंतु अद्याप कोणाविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही.

Related Stories

स्वाभिमानीचे गांधी जयंतीला सत्याग्रह आंदोलन

datta jadhav

नेचर इन नीडचे काम ठप्प तरी ही प्रशासन गप्प

Patil_p

संजय राऊतांच्या घरी ईडीचा छापा, 3 पथकांकडून तपास सुरू

datta jadhav

सातारा : डबेवाडीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ

datta jadhav

ताकवलीत महिलेची आत्महत्या

datta jadhav

…अन्यथा आम्हाला विष पिऊन मरू द्या : खा. उदयनराजे

datta jadhav