Tarun Bharat

शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तभांवर फडकविला राष्ट्रध्वज

शुक्रवारचा दिवस जम्मू- काश्मीरच्या किश्तवाड जिल्हय़ाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी होणार नोंद

प्रतिनिधी / बेळगाव

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्हय़ाच्या इतिहासात शुक्रवारचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाणार आहे. कारण या दिवशी शहराच्या कुलिद चौकामध्ये सर्वात उंच म्हणजे शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि तो लोकांना समर्पित करण्यात आला.

यानिमित्त आयोजित शानदार सोहळय़ात मेजर जनरल अजयकुमार, जनरल ऑफिसर कमांडिंग सीआयएफ (डेल्टा) यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ब्रिगेडियर प्रणब मिश्रा, कमान अधिकारी कर्नल अमेय चिपळूणकर 17 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाईट इन्फंट्री), किश्तवाडचे डेप्युटी कमिशनर अशोक कुमार, एसएसपी शफाकत हुसेन उपस्थित होते.

यावेळी मेजर जनरल अजयकुमार यांनी शहीद स्मारकाचेही उद्घाटन केले. हे स्मारक आतंकवादी लढय़ात जे शहीद झाले, त्यांना समर्पित करण्यात आले आहे. शंभर फूट उंचीचा ध्वजस्तंभ जम्मू-काश्मीरमध्ये चार-पाच जिल्ह्य़ांमध्ये आहे. किश्तवाडमधील राष्ट्रध्वज उभारण्यासाठी 17 राष्ट्रीय रायफल्सचा मोलाचा वाटा आहे. कर्नल अमेय चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जवानांनी हिमतीने व जोशाने कमी वेळेत राष्ट्रध्वज उभारला आहे.

याप्रसंगी किश्तवाडचे जिल्हाधिकारी अशोक शर्मा यांनी जलद गतीने सर्व मंजुरी व परवानगी दिल्याबद्दल सैन्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी त्यांची प्रशंसा केली. या प्रकल्पाचे देणगीदार कॅ. तुषार महाजन फाऊंडेशन, मेजर अक्षय गिरीश ट्रस्ट, किरण ठाकुर संचालित लोकमान्य ट्रस्ट बेळगाव, मंगलदास ट्रस्ट मुंबई व किश्तवाडमधील हैड्रोपॉवर कंपनी यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

उद्घाटनप्रसंगी जवानांनी झांजपथक सादर करून प्रेक्षकांना मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले.

Related Stories

सीमेपासून लढाऊ विमाने दूर ठेवा!

Patil_p

देशात 2.22 लाख संक्रमितांची नोंद

datta jadhav

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 7 जुलैपासून बैठक

Patil_p

यथोचित कारवाईची पूर्ण मुभा

Patil_p

४ डिसेंबरला छलवादी महासभेची पूर्वसभा..

Rohit Salunke

उत्तराखंडात कोरोना : 1333 नवे रुग्ण; 8 मृत्यू

Tousif Mujawar