Tarun Bharat

झुआरीवरील नवीन पुल आज जोडला जाणार

मुख्यमंत्री व साबांखामंत्री उपस्थित राहणार

प्रतिनिधी /वास्को

झुआरी नदीवरील नवीन पुलाच्या दोन्ही दिशा आज जोडल्या जाणार आहेत. या पुलाच्या एका मार्गाचे काम अंतीम टप्प्यात आलेले असून आज अंतीम सेगमेंट चढवून हा पुल जोडला जाणार आहे. सकाळी 11.30 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा पुल जोडण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश कार्बाल यावेळी उपस्थित असतील. पुढील दोन ते अडिच महिन्यांच्या काळात या पुलाचा एक मार्ग वाहतुकीसाठी सज्ज होणार आहे.

कोरोना काळामुळे तांत्रीक अडचणी निर्माण झाल्याने झुआरीवरील नवीन केबल स्टेड पुलाचे काम साधारण वर्षभर रेंगाळले गेले आहे. मात्र, आता या पुलाचा एक मार्ग पूर्ण करण्यास या पुलाचे काम करणाऱया दिलीप बिल्डकॉन कंपनीला जवळपास पूर्ण यश आलेले आहे. डीबीएलच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या प्रारंभी या पुलाचा एक मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. तशी धडपड कंपनीने चालवलेली आहे. आज मंगळवारी सकाळी 11.30 वा. पुलाचा अंतीम सेगमेंट चढवला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण व उत्तर गोवा एकमेकांशी जोडला जाणार आहे. हा पुल जोडला जाण्याचा क्षण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थित पार पाडला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश कार्बालही यावेळी उपस्थित असतील.

नवीन झुआरी पुल जोडला गेल्यानंतर अंतीम टप्प्यातील उर्वरीत काम दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतरच पुल वाहतुकीस सज्ज होईल. तोपर्यंत डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे.

Related Stories

म्हापशातील बेकायदेशीर झोपडय़ा पालिकेने हटविल्या

Amit Kulkarni

सांकवाळ पंचायतीला आनंद बोस बिल्डर्सकडून पंचायत घरासाठी जमीन दान

Omkar B

भ्रष्टाचारी भाजपपासून पवित्र स्थळे दूर ठेवूया : दिगंबर कामत

Amit Kulkarni

कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठी पेडणे तालुक्मयात सरकारी यंत्रणा लागली कामाला

Amit Kulkarni

नागरिकत्व मुद्यावरुन पणजी काँग्रेस पदाधिकाऱयांचा पक्षाला रामराम

Patil_p

राज्यपाल पिल्लई यांच्याकडून विजयादशमीच्या शुभेच्छा!

Patil_p