Tarun Bharat

शिंदे गटाकडून शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत आज नवी कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रवक्तेपदी आमदार दीपक केसरकर, नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे. तर उपनेते म्हणून यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या गटाची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत ही नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे 14 खासदारही उपस्थित होते. शिवसेनेचे एवढे खासदार शिंदे गटासोबत असतील तर ही संख्या दोन-तृतियांशपेक्षा जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेला विधानसभेपाठोपाठ लोकसभेमध्येही धक्का बसण्याची शक्यता आहे.

शिवसेनाप्रमुखपद रिक्त

शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेनापक्षप्रमुख या पदाबाबत मात्र, शिंदे गटाकडून कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. असं कोणतंही पद शिंदे गटाकडून तयार करण्यात आलं नाही.

हेही वाचा : RTE अंतर्गत 78 हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

Related Stories

नव्या लोकशाहीचा पाळणा हालतोय..त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतोय

Abhijeet Khandekar

हिरकणी रायडर ग्रुपचे कराडात स्वागत

Patil_p

शाहूपुरीतील समस्या तातडीने सोडवणार

Patil_p

कोविड -19 च्या प्रतिकारासाठी पडद्यामागील कलाकारांना रोगप्रतिकारक वस्तूंचे वाटप

datta jadhav

खासदार धैर्यशील माने यांना कोरोनाची लागण

Archana Banage

MIM च्या सभेनंतर आयोजकांवर गुन्हा दाखल

Archana Banage
error: Content is protected !!