ऑनलाईन टीम/तरुण भारत
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या १० सदस्यांचा शपथविधी आज, शुक्रवारी पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.
आज दुपारी १२ वाजता विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी पार पडला. २० जून रोजी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर, आमश्या पाडवी आणि भाई जगताप हे १० उमेदवार निवडून आले आहेत. या सर्वाना डॉ. गोऱ्हे यांनी शपथ दिली.