Tarun Bharat

‘त्या’ ड्रोनसंबंधी प्रकरणाची एनआयएने चौकशी करावी

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उचित तपास करण्यात यावा- परशुराम गोमंतक सेनेची मागणी

प्रतिनिधी /मडगाव

शारजाहहून गोव्याला आलेल्या एका प्रवासी विमानातून डीजेआय मॅवीक ऍर 2 फ्लायमोर कोम्बो जातीची 19 ड्रोन आयात प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गोव्यातील परशुराम गोमंतक सेनेने केली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे हे एक सांघीक गुन्ह्याचे कृत्य असल्याचा आरोप या संघटनेने केलेला असून या एकंदर प्रकरणाचा एनआयएतर्फेच चौकशी करणे गरजेचे असल्याचे म्हटलेले आहे.

28 एप्रिल 2022 रोजीच्या ‘तरुण भारत’च्या अंकात शारजाहून आणलेले 19 अत्याधुनिक ड्रोन जप्त’ हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल गोव्यातील परशुराम गोमंतक सेनेने त्वरीत घेतली आणि या एकंदर प्रकरणाचा तपास नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीमार्फत (एनआयए) करण्यात यावा अशी मागणी परशुराम गोमंतक सेनेचे प्रमुख शैलेंद्र वेलिंगकर यांनी केली आहे.

देशाच्या सुरक्षिततेकडे संबंधीत असलेल्या अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले म्हणून या संस्थेने ‘तरुण भारत’चे कौतूक केले आणि या प्रकरणाच्या मुळाकडे जाण्याची काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया वेलींगकर यांनी व्यक्त केली.

गोव्यात ड्रोनचे स्मगलींग

सोन्याचे स्मगलींग, तंबाखुचे स्मगलींग यासारखे स्मगलींग आपण यापूर्वी ऐकलेले असाल. मात्र, ड्रोनचे स्मगलींग गोव्यात कधी झालेले आपण ऐकलेले आहात का? कधी नव्हे असे हे स्मगलींग हल्लींच दाबोळी विमानतळावर झालेले आहे. या ड्रोनचा आणि देशाच्या सुरक्षेकडे संबंध असल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करणे अत्यंत आवश्यक बाब झालेली असून कुठलाही विलंब न लावता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे असे या संघटनेने म्हटलेले आहे.

शारजाहहून अत्याधुनिक ड्रोन स्मगलींग करण्याच्या प्रकरणात काही संशयिताना ताब्यात घेण्यात आलेले आहे. मात्र, किती आणखी संशयिताना या प्रकरणातून सहीसलामत बाहेर जाऊ देण्यात आले याचीही चौकशी करणे गरजेचे असल्याचे या संघटनेने म्हटलेले आहे. ऍरलाईन्स अधिकारी, कस्टम अधिकारी यांच्या सहकार्याशिवाय अशा प्रकारच्या ड्रोनचे स्मगलींग होणे शक्य नसल्याचा दावा परशुराम गोमंतक सेनेने केला आहे.

पार्श्वभूमी

19 एप्रिल 2022 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरलेल्या या विमानातील संशयित आरोपी हे उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र राज्यातील असल्यामुळे या प्रकरणाला आंतरराज्य स्वरुप प्राप्त झाले आहे.

महम्मद अयुब उर्फ महमद अयुब मोहसीन राझा, जनेत अफझल शेख आणि जेनुदल हक यांना महसूल गुप्तचर खात्याच्या गोवा प्रांतातील अधिकाऱयांनी कस्टम कायद्याच्या 104 व 135 कलमाखाली अटक केली आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी शारजाहून गोव्यात आल; तेव्हा त्यांच्याकडे तंबाखु, पेस्टच्या रुपातील सोने आणि डीजेआय मॅवीक ऍर 2 फ्लायमोर कोम्बो जातीची 19 ड्रोन सापडली. ड्रोन सापडल्यामुळे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत नाजुक असे होते.

जप्त करण्यात आलेले ड्रोन कुठल्या प्रकारचे आहेत आणि त्या ड्रोनची खासियत काय आहे आणि इतकी ड्रोन कशासाठी भारतात आणण्यात आलेली आहेत याचा सध्या तपास चालू असल्याचे समजते.

Related Stories

आसगावात झाडांची कत्तल करण्यास ग्रामस्थांचा विरोध

Patil_p

तृणमूल काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सचिवपदी दशरथ मांदेकर

Amit Kulkarni

शिमगोत्सव मिरवणुकीने कुडचडे नगरी दुमदुमली

Amit Kulkarni

एनएसयुआयच्या तीन विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

Amit Kulkarni

मार्केट संकुल बंदीवर दुसऱया दिवशी कारवाई सुरूच

Omkar B

पुंकळ्ळीत दीड हजार मास्कचे वितरण

Omkar B