Tarun Bharat

5 वर्षात 5जी वापरकर्त्यांची संख्या 50 कोटीवर पोहचणार

मुंबई

 आगामी 5 वर्षाच्या कालावधीत 5 जी सेवायुक्त मोबाइल वापरकर्त्यांची संख्या 50 कोटींवर पोहचण्याची शक्यता सांगितली जात आहे. एरिक्सन यांनी याबाबतचा अंदाज नुकताच वर्तवला आहे.

भारतात 5 जी वापरकर्त्यांची संख्या टक्केवारीत पाहता 39 टक्के इतकी राहणार आहे. येणाऱया काळात स्मार्टफोन खरेदीदारांच्या संख्येतही वाढ अपेक्षीत आहे. यात 5 जी सेवा युक्त मोबाइल्सची मागणी अधिक राहणार आहे. मोबाइल डाटा वापरण्यातही येणाऱया काळात वाढ होणार आहे. 4 जी सेवायुक्त मोबाइल्सचा भारतातील वाटा 68 टक्के इतका नोंदला गेला आहे. 2027 पर्यंत हा वाटा 55 टक्क्यापर्यंत घसरेल असेही सांगितले जात आहे. ऑगस्टमध्ये 5 जी सेवा सुरू होण्याची अपेक्षा असून 26 जुलैला स्पेक्ट्रमसाठी बोली लावली जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

विषय सतत संसारचक्र फिरते ठेवत असतात

Patil_p

विदेशी चलन साठय़ात 2.5 अब्ज डॉलरची वाढ

Patil_p

सार्वजनिक खर्च वाढवा

Patil_p

3 महिन्यात स्मार्टफोन्स 5 जी सेवांशी सुसंगत करणार

Amit Kulkarni

बीपीसीएलच्या खरेदीसाठी वेदान्ताची तयारी

Patil_p

तिसऱया सत्रात सेन्सेक्सची 740 अंकांवर झेप

Patil_p