Tarun Bharat

मे मध्ये हवाई प्रवाशांची संख्या कोटीवर

मुंबई : देशांतर्गत विमानप्रवाशांच्या संख्येमध्ये मे मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मे महिन्यामध्ये 1 कोटी 20 लाख प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला असल्याचे दिसून आले आहे.

मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये 11 टक्के इतकी वाढ दिसली आहे. कोरोनापूर्व परिस्थितीमध्ये पोहोचण्याकडे विमानसेवेचा प्रवास सुरू असताना दिसतो आहे. याआधी मे 2019 मध्ये 1 कोटीपेक्षा अधिक प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला होता. त्यावेळेप्रमाणे आता विमानांच्या संख्येत वाढ होत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसतो आहे.

Advertisements

यामध्ये स्पाईस जेट कंपनीच्या विमानाने जास्तीतजास्त प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे माहितीमध्ये समोर आले आहे. स्पाईसजेटच्या विमान प्रवाशांचा वाटा 89 टक्के इतका राहिला आहे. जो एप्रिल 2022 मध्ये 85 टक्के इतका होता. असे जरी असले तरी इंडिगोने विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाटा उचलला आहे.

Related Stories

सेन्सेक्समध्ये 581 अंकांची घसरण

Amit Kulkarni

कच्चे पोलाद उत्पादन 68 लाख टनावर

Patil_p

जिओ दूरसंचार क्षेत्रात देशात चमकणार

Patil_p

. बीपीसीएल खरेदीच्या निविदा सादर करण्यास मुदत वाढ

Patil_p

शेअर बाजाराचा आठवडय़ाचा शेवट मोठय़ा घसरणीने

Patil_p

अनावश्यक कॉल्सपासून मोबाईल ग्राहकांची होणार सुटका

Patil_p
error: Content is protected !!