Tarun Bharat

गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढली

मार्चअखेर 8 कोटींवर डीमॅट खाती ः गुंतवणूकही दुप्पट

वृत्तसंस्था/ मुंबई

मार्च 2020 मध्ये कोरोनाने कहर केल्यानंतर देशातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱयांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याची बाब समोर आली आहे. मार्च 2020 पर्यंत देशात 4.09 कोटी डीमॅट खाती होती. मार्च 2022 रोजी हीच संख्या 8.97 कोटींवर पोहचली आहे. म्हणजेच गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत दर महिन्याला 20 लाख पेक्षा जास्त डीमॅट खाती उघडण्यात आली आहेत. एवढंच नाही तर या खात्यांतर्गत शेअर बाजारात होणारी गुंतवणूक दुप्पट होत 2 लाख कोटी रुपयांवर पोहचली आहे.

स्मार्टफोन्सचा वाटा लक्षणीय

गुंतवणूक वाढण्यामागे स्मार्टफोन्सचा वाटा लक्षणीय राहिला आहे. शेअर बाजारात उत्तम नफा मिळण्याच्या आशेने अनेकांनी डीमॅट खाते उघडून गुंतवणूक करण्यात रस घेतल्याचे दिसले.

70 टक्क्यांची पहिल्यांदाच गुंतवणूक

70 टक्के ग्राहकांनी पहिल्यांदाच बाजारात गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले आहे. टायर टू आणि टायर थ्री शहरांमध्ये डीमॅट खाती उघडणाऱया नव्या ग्राहकांची संख्या 80 टक्के इतकी गणली गेली आहे. यात 70 टक्के जणांनी पहिल्यांदा गुंतवणूक केलीय.

Related Stories

विप्रो सर्वात मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत

Patil_p

देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे एसबीआयचे संकेत

Omkar B

कोरोना काळात ऑनलाईन खरेदी तेजीत

Omkar B

जूनपर्यंत नोंदणीकृत कंपन्यांची संख्या 20.14 लाखाच्या घरात

Patil_p

टाटा सन्स सुटय़ा पार्टचा प्रकल्प उभारणार

Patil_p

आवास योजनेसाठी गोदरेजकडून जमीन खरेदी

Patil_p