Tarun Bharat

दोन्ही पाय गमाविलेल्या नर्सला मिळाली आयुष्यभराची साथ

Advertisements

रशियाच्या हल्ल्यात गमावले दोन्ही पाय : प्रियकरासोबत रुग्णालयातच विवाहबद्ध

रशिया आणि युक्रेनचे युद्ध 70 दिवसांपासून सुरू आहे. या युद्धात मोठय़ा संख्येत लोकांनी जीव गमावला आहे. तर अनेकांसोबत युद्धाच्या वेदना जीवनभरासाठी जोडल्या गेल्या आहेत. लिसिचांस्क येथील 23 वर्षीय नर्स (परिचारिका) ओक्साना देखील अशाच लोकांपैकी एक आहे. युक्रेन युद्धात 27 मार्च रोजी ओक्सानाचा पाय एका भूसुरुंगावर पडून झालेल्या स्फोटात तिला दोन्ही पाय तसेच हाताची चार बोटंही गमवावी लागली आहेत.

अशा स्थितीतही ओक्सानाची साथ तिचा प्रियकर व्हिक्टरने सोडलेली नाही. दोघांनी रुग्णालय वॉर्डमध्येच विवाह केला आहे. दोघांचा एक व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून यात व्हिक्टर स्वतःच्या पत्नीला उचलून घेत नाचताना आणि रुग्णालयातील अन्य रुग्ण या दोघांच्या आनंदात सामील होताना दिसून येत आहेत.

ओक्साना क्हिक्टरसोबत स्वतःच्या घरी जात असताना तिने भूसुरुंगावर चुकून पाय ठेवला होता. भूसुरुंगाबद्दल व्हिक्टरला सतर्क करण्यासाठी ती वळली असता स्फोट झाला होता. या स्फोटात व्हिक्टरला कुठलीच ईजा झालेली नाही. परंतु ओक्साना गंभीर जखमी झाली. ओक्सानावर डॉक्टरांनी चार शस्त्रक्रिया केल्या. कृत्रिम अवयव बसविण्यात आल्यावर नववाहित दांपत्य लवीव येथे जाणार असल्याचे लवीव मेडिकल असोसिएशनने सांगितले आहे.

ओक्साना आणि व्हिक्टर मागील 6 वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये आहेत. ओक्साना जखमी झाल्याने जीवनात पुढे काय होईल हे माहित नसल्याने एकत्र राहण्याचा निर्णय आणखीन न टाळण्याचा निश्चय दोघांनी केला होता. युक्रेनच्या संसदेनेही ट्विट करत ओक्साना आणि व्हिक्टरची विशेष लव्हस्टोरी शेअर करत दोघांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ओक्साना स्फोटानंतर बेशुद्ध पडली नव्हती. तिला पाहिल्यावर मीच घाबरून गेलो होतो. त्यावेळी नेमके काय करावे हेच सुचत नव्हते. कशाप्रकारे तरी तिला रुग्णालयात नेऊ शकलो. एक महिन्यापर्यंत तिच्यावर उपचार चालले. डॉक्टरांनी जोरदार प्रयत्न करूनही अखेरीस तिचे दोन्ही पाय आणि हाताची बोटं कापावी लागल्याचे व्हिक्टरने सांगितले आहे. हे दांपत्य आता जर्मनीत जाण्याची तयारी करत आहे. तेथे ओक्सानाला कृत्रिम पाय बसविण्यात येणार आहेत.

Related Stories

थायलंडमध्ये शरण घेणार गोटाबाया राजपक्षे

Patil_p

जपानमध्ये हिमवादळाचा कहर 30 वाहनांची परस्परांना धडक

Patil_p

अमेरिकेकडून पंतप्रधान मोदी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित

datta jadhav

पाकिस्तानचे विमान मलेशियाने केले जप्त

Patil_p

इस्लामाबादमध्ये होणार हिंदू मंदीर, स्मशानमूमीलाही जागा

Patil_p

अमेरिकेत बाधितांनी ओलांडला 3 कोटींचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!