Tarun Bharat

अजिंक्यताऱ्याच्या कड्यावरून पाय घसरून वृद्ध दरीत पडला

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :

किल्ले अजिंक्यतारा येथील जुन्या कड्यावरुन पाय घसरुन एक वृद्ध दरीत पडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि शिवेंद्रराजे ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरु असून, वृद्ध जिवंत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

हणमंत जाधव (वय 64, रा.वडगाव, पुणे) असे या वृद्धाचे नाव आहे. ते बेपत्ता झाल्याची तक्रार सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना एक वृद्ध दरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शहर पोलिसांना यांची माहिती देवून शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या माध्यमातून बचाव कार्य सुरु आहे. हे वृद्ध पुणे येथील वडगावचे रहिवाशी आहेत. त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आहेत. वृद्ध पाय घसरून पडले की त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Related Stories

धोका वाढला : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 11,147 नवे कोरोना रुग्ण; 266 मृत्यू

Tousif Mujawar

खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात

Abhijeet Khandekar

धास्ती महापुराची…तयारी स्थलांतराची

Abhijeet Khandekar

केरळमधील लॉकडाऊनमध्ये 23 मे पर्यंत वाढ; मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची घोषणा

Tousif Mujawar

कार चारशे फूट दरीत कोसळली

Patil_p

पालिका निवडणुकीसाठी लोकसंख्येनुसार आरक्षण पडण्याची शक्यता

Patil_p
error: Content is protected !!