Tarun Bharat

हिंदू दलित तरुणाच्या ऑनरकिलींगचे प्रकरण तापले

Advertisements

तरुणाच्या मुस्लीम पत्नीचेही स्वतःच्या भावाविरोधात वक्तव्य 

हैदराबाद / वृत्तसंस्था

येथे गुरुवारी नागराजू नामक दलित तरुणाची त्याने मुस्लीम तरुणीशी विवाह केल्याने त्या तरुणीच्या नातेवाईकांनी भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. हत्या झालेल्या नागराजूची पत्नी अश्नीना (सध्याची पल्लवी) हिने आपल्या भावाविरोधात वक्तव्य दिले आहे. आपल्या भावाने आपल्याला दोनदा फासावर लटकविण्याचा प्रयत्न केला होता, असे तिने स्पष्ट केल्याने या प्रकरणी आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा निर्माण झाला आहे.

हत्येचा हा प्रकार सीसीटीव्हीवर चित्रित झालेला आहे. त्याच फूटेजच्या आधारावर तिचा भाऊ आणि भावाचा मेव्हणा यांना अटक करण्यात आली आहे. या तरुणीच्या माहेरच्या नातेवाईकांचा या विवाहाला तीव्र विरोध होता. तो विरोध पत्करुन या तरुणीने नागराजू याच्याशी विवाह केला होता. लग्नापूर्वी हे जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही काळ होते. हे संबंध तिच्या भावाला अमान्य असल्याने त्याने तिला दोनवेळा फासावर लटकविण्याचा प्रयत्न केला होता. नागराजूशी विवाह केल्यास तुम्हा दोघांनाही ठार केले जाईल, असा इशारा तिच्या आईनेही दिला होता, असेही या तरुणीने स्पष्ट केले आहे.

संरक्षणाचा प्रयत्न केला होता

या जोडप्याला या धोक्याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परीने संरक्षणाची तयारी केली होती. त्यांनी त्यांची सीमकार्डस् बदलली होती. त्यामुळे त्यांचे स्थान कळणार नाही, अशी त्यांची समजूत होती. एक महिन्यापूर्वीही तिच्या भावाने त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचे लोकेशन त्याला न कळल्याने त्याचा प्रयत्न विफल ठरला होता. मात्र 5 मे यादिवशी त्यांनी नागराजूला गाठले आणि त्याची भररस्त्यात निर्घृण हत्या केली.

Related Stories

लडाखमध्ये बस नदीत कोसळून ७ जवानांचा मृत्यू

Archana Banage

कोरोना सामग्रीसंबंधी आज जीएसटी मंडळाची बैठक

Patil_p

गुवाहाटीत 14 दिवस पूर्ण लॉकडाऊन

Patil_p

प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

Tousif Mujawar

पत्थलगडीला विरोध, 7 जणांची हत्या

Patil_p

मध्यप्रदेशातील शहडोल, अनुपपूरमध्ये भूकंपाचे धक्के

datta jadhav
error: Content is protected !!