नामोल्लेख न करता शिवपाल यांचा अखिलेश यांच्यावर निशाणा
@ वृत्तसंस्था / लखनौ
प्रगतिशील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव आणि समाजवादी पक्षाचे अक्ष अखिलेश यादव यांच्यातील वाप्युद्ध सुरूच आहे. शिवपाल यांनी मंगळवारी ट्विट करत अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही ज्याला चालायला शिकविले तोच आम्हाला चिरडत गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवपाल यांच्या या ट्विटनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमच्या सन्मानाच्या किमान पातळीवर जात मी त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरीही आम्ही नाराज असू तर त्याने हृदयात किती खोल जखम केली असेल याचा विचार करा. आम्ही त्याला चालणे शिकविले आणि तो आम्हाला चिरडत गेल्याचे शिवपाल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून काका आणि पुतण्यातील वाक्युद्ध तीव्र झाले आहे. विधिमंडळातील पक्षाच्या बैठकीत निमंत्रित न केल्याने नाराज असलेले शिवपाल हे लवकरच एखादी मोठी घोषणा करू शकतात. तर ते भाजपमध्ये जाण्याची चर्चाही मधल्या काळात सुरू होती.