Tarun Bharat

निर्जन बेटावरील एकमेव घर

एका बेटावर एकच घर असून तेथे दूरदूरपर्यंत कुणी राहत नाही. हे बेट आइसलँडमध्ये असून तेथील घराला सर्वात एकांतवासातील घर मानले जाते. या बेटाचे भौगोलिक स्थान पाहता या घराची निर्मिती अनेकांना अचंबित करणारी आहे.

हे घर एलिडे नावाच्या बेटावर आहे. हे बेट आइसलँडच्या दक्षिणेत स्थित आहे. बेटाचा आकार 110 एकरांचा असून वेस्टमॅनिजार आर्किपिलागो अंतर्गत हे तिसरे सर्वात मोठे बेट आहे. बेटावर केवळ पफिन्स पक्षी आढळून येतात.

बेटावर तयार करण्यात आलेले हे घर प्रत्यक्षात एक हंटिंग लॉज असून त्याची निर्मिती एलिडे हंटिंग असोसिएशनकडून करण्यात आाrल होती. बेटावरील लोकसंख्या शून्य आहे, म्हणजेच येथे कुणीच राहत नाही. परंतु प्रारंभी असे नव्हते. सुमारे 300 वर्षांपर्यंत बेटावर 5 कुटुंबांचे वास्तव्य होते आणि ते सीफाउल, पफिन्सची शिकार अन् पशूपालन करायचे आणि सागरात मासेमारी करत होते.

समुद्रादरम्यान अन्य संस्कृतींपासून दूर राहणे या कुटुंबांसाठी अत्यंत अवघड होते. याचमुळे 1930 च्या सुमारास या कुटुंबांनी तेथून स्थलांतर केले होते. काही काळातच एलिडे बेट निर्जन ठरले होते. तेथे कुणीच राहत नव्हते. परंतु लोक तेथील पफिन्स पक्ष्यांच्या शिकारीच्या कहाण्या ऐकत होते. मागील काही वर्षांपासून लोक तेथे शिकारीसाठी जाऊ लागले आहेत. याचमुळे हंटिंग असोसिएशनने लोकांच्या सुविधेसाठी तेथे एक लॉज सुरू केले आहे. 1950 च्या काळात असोसिएशनने बेटावर केबिन तयार केले, तेथे लोक शिकारीच्या हंगामात वास्तव्य करू शकत होते. मुख्य भूमीपासुन बेटावर नौकेद्वारे पोहोचता येते. येथील घरात वीज तसेच पाण्याची व्यवस्था नाही.

Related Stories

हैतीमध्ये भूकंप ; आतापर्यंत १,२९७ लोकांचा मृत्यू तर अनेक शहरं उद्ध्वस्त

Archana Banage

‘युएन’मध्ये पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Amit Kulkarni

समाजाप्रती कृतज्ञता भावनेतून काम केल्यास घडते चांगले कार्य : महापौर

Tousif Mujawar

एसिम्पटोमॅटिक : संसर्गाची शक्यता कमी

Patil_p

पूरात बुडाले गाव तरीही लोक आनंदी

Patil_p

काबूल स्फोटामागे ‘आयएस’चा हात

Patil_p