Tarun Bharat

ऑर्केस्ट्राने घरकुल प्रदर्शनात आणली रंगत

घरकुल प्रदर्शनाला बेळगावकरांची दाद : गृहोपयोगी-महिलांचे साहित्य उपलब्ध असणाऱया स्टॉलवरही गर्दी

प्रतिनिधी /बेळगाव

तरुण भारत पुरस्कृत घरकुल 2022 प्रदर्शनामध्ये रविवारी विकेंडमुळे मोठी गर्दी झाली होती. स्टॉलवरील साहित्याची माहिती घेण्यासोबतच ऑर्केस्ट्रामधील हिंदी, मराठी गीतांचा मनमुराद आनंद नागरिकांनी लुटला. एकाहून एक सरस गाणी सादर करून बेळगाव तसेच परिसरातील गायकांनी बेळगावकरांची दाद मिळविली.

तरुण भारत पुरस्कृत, रोटरी क्लब बेळगाव आयोजित व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीपीएड मैदानावर शुक्रवारपासून घरकुल 2022 प्रदर्शनाला थाटात प्रारंभ झाला. रविवारी तिसऱया दिवशीही नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. गृहनिर्माण क्षेत्रासाठी लागणारे सर्व साहित्य व उपकरणे प्रदर्शनात मांडल्याने माहिती घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विकेंडमुळे कुटुंबासमवेत अनेकजण प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करीत होते.

इंटिरीअर, फर्निचर, सिमेंट, दरवाजे, विविध उपकरणे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, पाईप, पेस्ट कंट्रोल यासह इतर 150 हून अधिक स्टॉल प्रदर्शनात आहेत. याचबरोबर प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱया नागरिकांसाठी चमचमीत खाद्य पदार्थही उपलब्ध आहेत. त्यामुळे फुड स्टॉलवरही झुंबड उडाली आहे. याचबरोबर गृहोपयोगी व महिलांचे साहित्य उपलब्ध असणाऱया स्टॉलवर गर्दी झाली होती.

बेळगावकरांची टाळय़ांनी दाद

रविवारी हार्मनी म्युझिकल ग्रुपने अप्रतिम हिंदी, मराठी गाणी सादर केली. रसिकांनी टाळय़ांची दाद देत गायकांचे कौतुक केले. कोल्हापूर येथील मिलिंद वेदांते, इचलकरंजी येथील स्मिता गोसारवाडकर, गडहिंग्लज येथील दीपक चौगुले, कोल्हापूर येथील गणेश भोसले, मंगेश पाटील व मनोज जोशी यांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली. या ग्रुपमध्ये विनायक बांदेकर यांचाही समावेश आहे.  

घरकुलअंतर्गत तांत्रिक प्रश्नमंजुषा

घरकुल प्रदर्शनांतर्गत रविवारी घेण्यात आलेल्या तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. गृहनिर्माण क्षेत्रावर अवलंबून असणाऱया घरकुल प्रदर्शनात विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी टेक्निकल फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळच्या सत्रात विविध सेमिनार व स्पर्धा घेतल्या जात आहेत.

रविवारीही सकाळच्या सत्रात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. टेक्निकल प्रश्नमंजुषा घेऊन इंजिनियरिंग, डिप्लोमा व आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये जीआयटी कॉलेजचे विद्यार्थी अमृता अडगनकर व मोहंमद मझहर सय्याद याने प्रथम क्रमांक पटकाविला. केएलई कॉलेजचे विद्यार्थी ओंकार हिबारे व शारूखखान बरखण्णावर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तर वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकचे संगनगौडा पाटील व तेजस पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

यावेळी कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, वैजनाथ चौगुले, राजू होंगल, इव्हेंट चेअरमन सी. आर. पाटील, वेंकटेश पठाण यासह इतरांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.  

Related Stories

सिग्नेचर, आर. एस. वॉरियर्स संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

सरस्वतीनगर येथे रुंदीकरणावेळी हुकूमशाही

Omkar B

रक्षाबंधन : नाजूक भावनांची जपणूक करणारा दिवस

Amit Kulkarni

राज्य फुटबॉल स्पर्धेत संत मीराला दुहेरी मुकुट

Amit Kulkarni

बेनकनहळ्ळी येथे मल्लखांबचे मोफत प्रशिक्षण

Patil_p

शिवसेनेतर्फे टिळक जयंती साजरी

Amit Kulkarni