युद्धस्थितीत महिलांवर कुटुंबाची जबाबदारी
दररोज रात्री मुलांना घेऊन जातात बंकरमध्ये ः दोन महिन्यांपासून पतीपासून दूर
युक्रेनच्या फर्स्ट लेडी आणि अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्या पत्नी ओलेना यांनी युद्धामुळे महिलांवर ओढवलेली दयनीय स्थिती शब्दांद्वारे मांडली आहे. युद्धादरम्यान महिलांची स्थिती बिकट होत चालली आहे. 24 फेब्रुवारी रोजी मी माझ्या पतीला म्हणजेच अध्यक्ष झेलेंस्की यांना अखेरचे पाहिले होते. तेव्हापासून ते एखाद्या सैनिकाप्रमाणे जगत आहेत असे ओलेना म्हणाल्या.
युद्धाच्या प्रारंभिक दिवसांमध्sयच अध्यक्षांचे कार्यालय सैन्य कार्यालयात रुपांतरित करण्यात आले. तेव्हापासून अध्यक्ष झेलेंस्की स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. तेव्हापासून आम्हा दोघांमध्ये केवळ फोनवरून बोलणे झाले आहे. आमची मुले युक्रेनमधील अन्य मुलांप्रमाणे सर्वकाही पाहत आहेत. युद्ध हे मुलांनी पाहण्यासारखी गोष्ट नसली तरीही आमच्या देशाची स्थिती या मुलांपासून लपून राहिलेली नसल्याचे ओलेना यांनी म्हटले आहे.
युक्रेनची मुले होतील देशभक्त
युक्रेनची मुले मोठी होऊन देशभक्त आणि स्वतःच्या मातृभूमीचे रक्षक होतील. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी स्वतःच्या देशाच्या लोकांना वेगळे पाडले आहे. परंतु युक्रेनियन नागरिकांसोबत असे करणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
महिलांची स्थिती दयनीय
आमच्यापैकी एका महिलेवर अत्याचार करण्यात येतो, बलात्कार किंवा मारून टाकले जाते तेव्हा आम्हा सर्वांचे शोषण करण्यात येत असल्याचे वाटते. आमच्या देशाच्या लोकांसोबत काय घडतेय याबद्दल कुठलाच देखावा करण्याची गरज नाही. आमच्या देशाच्या लोकांचा संताप आणि वेदना सर्वांनाच जाणवत आहेत. आमच्या देशात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी सर्वकाही करण्यास तयार आहोत असे उद्गार ओलेना यांनी काढले आहेत.
बॉम्बशेल्टरमध्ये अनेक मुलांचा जन्म
युद्धादरम्यान अनेक लोक मदतीसाठी धावून आले. युक्रेन आता स्वयंसेवकांचा देश ठरला आहे. प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या प्रकारे मदत करतोय. कलाकार, चित्रकार, हेयर ड्रेसर आणि रेस्टॉरंटचे मालक देखील मदत करत आहेत. युद्धादरम्यान हजारो महिलांच्या मुलांचा जन्म बॉम्बशेल्टरमध्ये झाला आहे.
40 लाख महिलांनी सोडले युक्रेन
रशियाच्या नियंत्रणातून शहरे मुक्त होऊ लागताच महिला का पलायन करत होत्या हे जगाला कळू लागले आहे. रशियाच्या सैन्याच्या माघारीनंतर बुचा आणि कीव्हनजीकची अन्य गावे मुक्त करविण्यात आली आहेत, या गावांमध्ये मारले गेलेल्या नागरिकांच्या सामूहिक दफनभूमींचा खुलासा झाल्याचे ओलेना म्हणाल्या.
अनेक देशांकडून सहाय्य
रशियसोबतच्या युद्धात युक्रेनला मदत करणाऱया देशांचे आम्ही आभारी आहोत. असे ओलेना यांनी म्हटले आहे. त्यांनी एक टेलिग्राम चॅनेल सुरू करत यात युक्रेनच्या नागरिकांना स्वतःचे युद्धाचे अनुभव शेअर करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
लिथुआनियाच्या पंतप्रधानांकडून युक्रेनचा दौरा
विध्वंस व्यक्त करण्यासाठी नाहीत शब्द ः मारियुपोलमध्ये 10 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेन युद्धाला लवकरच 50 दिवस पूर्ण होणार आहेत. याचदरम्यान लिथुआनियाच्या पंतप्रधान इंग्रिडा सिमोनीटे यांनी कीव्हनजीक बोरोडय़ांकाचा दौरा केला आहे. त्यांच्या या दौऱयादरम्यान बचावपथकाला ढिगाऱयाखाली अनेक मृतदेह आढळून आले आहेत. जो विध्वंस पाहिला तो शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नसल्याचे लिथुआनियाच्या पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले आहे.
नरसंहाराप्रकरणी रशियाला दंड ठोठावण्याची गरज आहे. युद्धगुन्हय़ांच्या चौकशीत लिथुआनिया सामील होणार आहे. रशियाला आम्हा सर्वांना एकत्र येत रोखावे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या. तर मारियुपोल शहराचे महापौर वादिम बॉयचेंको यांनी रशियाच्या हल्ल्यामुळे 10 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे विधान केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे कीव्हचा दौरा करणार नसल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्याने दिली आहे. तर युरोपीय महासंघाने रशियाच्या विरोधात लादलले निर्बंध अत्यंत कमकुवत असल्याचे उद्गार पोलंडच्या पंतप्रधानांनी काढले आहेत.
माजी अध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांच्या सरकारमध्ये काम करणाऱया रशियाच्या हस्तकाला ताब्यात घेतल्याची माहिती युक्रेनने दिली आहे. रशियाच्या सैनिकांना युक्रेनमध्ये पुढे सरकण्यापासून रोखण्यास यश येत असल्याचे उद्गार युक्रेनच्या जनरल स्टाफने काढले आहेत.
रासायनिक अस्त्रांचा वापर
रशियाने मारियुपोलमध्ये युक्रेनच्या सैनिकांच्या विरोधात विषारी पदार्थाचा वापर केला होता. यामुळे युक्रेनच्या सैनिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. रशियाने युद्धात रासायनिक अस्त्रांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती असे युक्रेनच्या आजोव्ह रेजिमेंटकडून सांगण्यात आले.
ऑस्ट्रियन चॅन्सेलरसोबत चर्चा
ऑस्ट्रियन चॅन्सेलर कार्ल नेहमर यांनी मॉस्कोच्या दौऱयावर जात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आहे. युक्रेनचे नागरिक मारले जात असल्याने निर्बंध कायम राहणार आहेत. या युद्धामुळे लोकांना अत्यंत अधिक क्षास सहन करावा लागला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रशियाच्या सैनिकांकडून स्फोटासाठी ‘खेळण्यां’चा वापर
मुलांना मारण्याची धमकी देत आत्मसमर्पणाचा दबाव ः टेडी बियरमध्ये बॉम्ब
रशिया आणि युक्रेनच्या युद्धात हजारो लोकांना जीव गमवावा लागला आहे. लाखो लोक बेघर झाले असून युक्रेनमध्ये सर्वत्र विध्वंसच दिसून येतोय. महिला आणि मुलांचा चित्कार स्फोटांच्या आवाजांमध्ये हरवून जात आहे. रशियाचे सैनिक युद्धात अनेक धोकादायक शस्त्रांचा वापर करत आहेत. मुलांना ठार करण्याची धमकी देत रशियाचे सैनिक युक्रेनच्या नागरिकांना आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडत आहेत. याकरता मुलांची खेळणी आणि टेडी बियरमध्ये स्फोटके भरून स्फोट घडवून आणत आहेत. यासंबंधीचा दावा कीव्हमधील एका डॉक्टरने केला आहे.
ब्रिटनमधून वैद्यकीय शिक्षण घेतलेले युरोलॉजिस्ट ऑलेक्झेंडर यत्सिन यांनी रशियाचे सैनिक सायकोलॉजिकल स्ट्रटेजीचा वापर करत असल्याचे सांगितले आहे. रशियाचे सैनिक युक्रेनच्या लोकांना भावनिकदृष्टय़ा दुबळे करत त्यांना सर्व काही सोडून जाण्यासाठी भाग पाडत असल्याचे यत्सिन म्हणाले.
रशियाच्या सैनिकांनी प्रथम शहरांवर बॉम्बवर्षाव केला, मग दिसेल त्याच्यावर गोळय़ा झाडल्या आणि रस्त्यांवर भूसुरुंग पेरेल आणि आता ते सर्वात क्रूर पद्धत अवलंबित आहेत. पुतीन यांचे सैनिक मुलांच्या खेळण्यांमध्ये स्फोटके भरून स्फोट घडवत आहेत. तसेच आता कुटुंबांना लक्ष्य करत असून युक्रेनच्या मुलांची हत्या घडविण्याच्या दिशेने ते पावले टाकत असल्याचा आरोप यत्सिन यांनी केला.
डॉ. यत्सिन हे कीव्हमध्ये युद्धात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करतात. रुग्णांची 24 तास देखभाल करता यावी म्हणून ते सध्या रुग्णालयातच राहत आहेत. यादरम्यान काही रुग्ण स्वतःसोबत घडलेल्या घटना त्यांना सांगत आहेत. जखमींच्या कहाणी ऐकू डॉ. यत्सिन यांना अनेकदा धक्का बसतो. कीव्हमध्ये मी कुठल्या रुग्णालयात आहे हे सांगू शकत नाही, कारण यामुळे रुग्णालयावर हल्ला होण्याची शक्यता आहे. रशियाच सैनिक आता दुर्बल लोकांवरही हल्ले करत असल्याचे ते म्हणाले.
पुतीन यांच्याकडून 150 हेरांची हकालपट्टी
रशियाच्या सैन्याला मोठे नुकसान ः अनेक हस्तकांना अटक
युक्रेनच्या युद्धात रशियाच्या सैन्याला झालेल्या मोठय़ा नुकसानामुळे भडकलेले राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी स्वतःच्या 150 गुप्तहेरांना बडतर्फ केले आहे. एवढेच नाही तर अनेक गुप्तहेरांना तुरुंगात डांबले आहे. शोधपत्रकारिता करणारी वृत्तसंस्था बेलिंगकॅटने स्वतःच्या अहवालात हा मोठा दावा केला आहे.
संबंधित सर्व हेर हे रशियाची कुख्यात गुप्तचर यंत्रणा एफएसबीचे होते. सोव्हियत महासंघाच्या काळातील गुप्तहेर यंत्रणा केजीबीच्या स्थानी याची निर्मिती करण्यात आली आहे. पुतीन हे यापूर्वी केजीबीचे गुप्तहेर राहिले आहेत. अनेक एफएसबी हस्तकांना तुरुंगात डांबण्यात आले आहे.
बडतर्फ करण्यात आलेले गुप्तहेर हे पाचव्या सर्व्हिसचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या डिव्हिजनची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली होती, तेव्हा पुतीन हे एफएसबीचे संचालक होते. या डिव्हिजनचे काम पूर्व सोव्हियत महासंघाच्या देशांमध्ये हेरगिरी करणे हेते. 5 व्या सर्व्हिसचे प्रमुख 68 वर्षीय कर्नल जनरल सर्गेई बेसेदा यांनाही नजरकैद करण्यात आले आहे. त्यांना आता कुख्यात यातना तुरुंग लेफोर्टोवोमध्ये ठेवण्यात आले आहे. हेरगिरीतील अपयशासाठी या सर्वांच्या विरोधात खटला चालविला जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या गुप्तहेरांना रशियाच्या हल्ल्यापूर्वी युक्रेनच्या स्थितीबद्दल रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयाला खोटी माहिती देण्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आले असल्याचा दावा बेलिंगकॅटचे संचालक क्रिस्टो ग्रोजेव्ह यांनी केला आहे. रशियाच्या सैन्याने हल्ला केल्यास मोठय़ा संख्येत युक्रेनचे लोक त्यांचे स्वागत करतील असे गुप्तचर यंत्रणांकडून पुतीन यांना सांगण्यात आले होते. परंतु याच्या उलट हजारोंच्या संख्येत रशियाचे सैनिक मारले गेले आहेत. तसेच युद्धात 45 दिवस होऊनही रशियाला मोठा विजय मिळविता आलेला नाही.
इज्युम शहरापर्यंत पोहोचले रशियाचे सैन्य
युक्रेनही झाला आक्रमक ः लुहांस्कमधील रशियाचा शस्त्रभांडार केला नष्ट
कीव्हवर विजय मिळविता न आल्याने रशियाने आता स्वतःच्या योजनेत बदल करत पूर्व युक्रेनवर लक्ष केंद्रीत केले आहे. रशियाच्या सैन्याचा मोठा ताफा इज्युम शहर आणि नीपर नदीच्या आसपास दिसून आला आहे. तर युक्रेनही आक्रमक भूमिका स्वीकारत बश्तांकामध्ये रशियाच्या क्रूज क्षेपणास्त्रांनी भरलेल्या ट्रकवर हल्ला केला आहे. युक्रेनच्या सैन्याने लुहांस्कमध्ये रशियाच्या शस्त्रभांडाराला नष्ट केले आहे.
रशियाचा 12.8 किलोमीटर लांबीचा ताफा इज्युम शहराच्या दिशेने सरकत आहे. याचे उपग्रहीय छायाचित्र देखील समोर आले आहे. रशियाने नीपर नदीच्या आसपास मोठय़ा हल्ल्याची योजना आखली असल्याची भीती अमेरिकेच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे.
खारकीव्ह शहराच्या दक्षिणपूर्वेला असलेल्या इज्युम शहरात आतापर्यंत युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या तोस–1ए सोल्त्सेप्योक यासारख्या शक्तिशाली तोफांना चुरशीची लढत दिली आहे. परंतु आता रशियाच्या सैन्याचा मोठा ताफा पोहोचल्यावर येथील स्थिती बदलू शकते.
युक्रेनचे सैनिक हार मानणार नाहीत. आगामी आठवडा युद्धात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण रशियाचे सैन्य आमच्या देशात पूर्वेला आणखीन मोठी मोहीम चालविणार असल्याचे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेतaaa