Tarun Bharat

Kolhapur : बील देण्याच्या कारणावरून हॉटेलच्या मालकास लाथा बुक्यांनी मारहाण

पुलाची शिरोली/वार्ताहर

हॉटेलचे बील देण्याच्या कारणातून पुलाची शिरोलीतील हॉटेल मालक यश धनाजी हांडे यास डोक्यात व तोंडावर वीट मारुन तसेच त्याच्या वडीलांना लाथा बुक्या मारुन गंभीर जखमी केले आहे. जखमी हांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहीत बाजीराव सातपुते, विशाल कांबळे व गुंड्या सर्व रा. विलास नगर, माळवाडी यासह अनोळखी पाच जणांवर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना शिरोली फाटा येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजता हॉटेल पंचवटीच्या बोळात घडली.

शिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहीत सातपुते, विशाल कांबळे व अन्य मिञ हॉटेल पंचवटीमध्ये जेवण व अन्य कारणांसाठी आले होते.‌ जेवून झाल्यावर हे सर्वजन बील न देता निघून जात होते. त्यांना यश हांडे यांनी बीलासाठी अडवले . यावेळी त्यांनी गुगल पे केले आहे असे सांगितले. पण रक्कम जमा झाली नव्हती. यामुळे वाद झाला. या वादात विशाल कांबळे व गुंड्या या दोघांनी यश हांडे याच्या डोक्यात व तोंडावर वीट मारुन गंभीर जखमी केले. दरम्यान त्याचे वडील व कामगार वाद मिटविण्यासाठी आले असता रोहीत सातपुते व अन्य पाच जणांनी लाथा बुक्या मारुन जखमी केले. व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलास तर तुझ्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली होती. सोमवार हांडे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात रोहीत सातपुते, विशाल कांबळे सह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील हे करीत आहेत.

Related Stories

ओबीसी आरक्षणाचा आज ‘सर्वोच्च’ फैसला

Archana Banage

प्राथमिक दूध संस्थांना 25 लाखांचे सॅनिटायझर

Archana Banage

कोल्हापूर : कंत्राटी कर्मचारी बनले कोरोना ‘योध्दा’

Archana Banage

कोल्हापूर शहरात व्यापार्‍यांचा जनता कर्फ्यू!

Archana Banage

रेंदाळात विषबाधेने 16 मेंढय़ाचा मृत्यू; तीन लाखांचे नुकसान

Abhijeet Khandekar

विमानतळाजवळ तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Archana Banage