Tarun Bharat

कास परिसरातले लोक जगले पाहिजेत

प्रतिनिधी / सातारा :

कास परिसरातील अनधिकृत बांधकामावरुन गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चांगलेच रान पेटले आहे. आज त्या परिसराची खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासमवेत पाहणी केली. पाहणीनंतर उदयनराजेंनी मीडियाजवळ प्रतिक्रिया व्यक्त करताना तिथली लोकंही जगली पाहिजेत, असे सांगून आमदार शिवेंद्रराजेंच्या सुरात नकळतपणे सूर मिसळला. त्यावरुन पर्यावरण प्रेमींनी सोशल मीडियावर नुसताच खैंदूळ सुरु केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.

कास परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत तहसीलदार आशा होळकर यांनी दिलेल्या नोटीसांवरुन सामाजिक कार्यकर्त्यांनी वातावरण तापवलं आहे. त्यात दोन्ही राजेंनी आपल्या भूमिका मांडल्या. त्यामुळे प्रत्यक्ष उदयनराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांनी कास परिसरातील बांधकामांची पाहणी करायला यावे, अशी विनंती केली होती. त्यानुसार रविवारी त्यांनी कास परिसरात पाहणी केली.

अधिक वाचा : दादा हा पहाटेसारखा ‘फ्लॉप शो’ नाही; ‘शोले’ आहे… श्रीकांत शिंदेंनी घातला अजितदादांच्या वर्मावर घाव

यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले, कास हा संपुर्ण डोंगरी भाग आहे. पाटण असेल, जावली असेल, या ठिकाणच्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे. आज कासला एक पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी कोणता तरी व्यवसाय केला तर आपल्या कुटुंबासोबत राहता येईल, अशी अपेक्षा ठेवत लोकांनी हॉटेल, रेस्टॉरंट उभी केली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्याने होकार दिला आहे. अधिकारी या नात्यांने त्यांच्यावर कायद्याचे बंधन आहे. निश्चितपणे शासनामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संपूर्ण मंत्री यांनी धारेणात्मक निर्णय घेतला आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी होईल.

जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका सहानभूमीची आहे. इथले लोक जगले पाहिजेत. याकरता शासनाकडून लवकरात लवकर जीआर, वा नियमावली काढून उपाययोजना करावी. या जागा त्यांच्या आहेत. इथल्या लोकांवर कोणी बळजबरी करुन घेतली असेल तर त्यांनी सांगावे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ज्यांनी उभे केले. त्यांनाही ती नियावली लागू पडते, असेही उदयनराजेंनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

हजाराची लाच पडली महागात

Patil_p

स्थायी समितीच्या सभेच्या अजेंड्यावर 350 विषयांची रेलचेल

datta jadhav

राष्ट्रध्वजाच्या विक्रीमुळे पालिकेच्या तिजोरीत वाढ

Patil_p

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सातारा अध्यक्षपदी डॉ. निलेश थोरात

datta jadhav

प. महाराष्ट्रात १६ ते १९ मेपर्यंत मुसळधार पावसाचा हवामानखात्याचा इशारा

Abhijeet Khandekar

परळी खोरे ठरतंय कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट

Archana Banage