Tarun Bharat

बिळांमध्ये राहतात गावातील लोक

Advertisements

उन्हाळय़ात थंडी तर हिवाळय़ात मिळतो उबदारपणा

आपण सर्वांनी उंदरांची बिळे पाहिली असेल. उंदिर स्वतःच्या बिळांमधून बाहेर पडतात, स्वतःचे अन्न फस्त करतात आणि पुन्हा बिळात शिरतात. जगाच्या नकाशावर एक असे गाव आहे, जेथील लोक बिळांमध्ये राहत आहेत.

इराणमधील कंदोवन या गावातील लोक शेकडो वर्षांपासून बिळांमध्ये राहत आहेत. जगातील काही गावे स्वतःचे सौंदर्य अणि  काही अजब परंपरांसाठी ओळखली जातात. इराणमधील कंदोवन गाव हे बिळांसारख्या घरांसाठी ओळखले जाते. या गावातील लोक स्वतःच्या घरांना उंदरांच्या बिळांच्या आकारात तयार करतात.

कंदोवन गावातील लोक स्वतःच्या घरांना बिळांचे स्वरुप देऊन उष्णतेपासून दिलासा प्राप्त करतात. ही घरं दिसण्यास अजब वाटत असली तरीही त्यात वास्तव्य करणे अत्यंत आरामदायक असते. हे गाव सुमारे 700 वर्षे जुने ओ. या गावात राहणाऱया लोकांना वातानुकुलित यंत्रणेची गरज भासत नाही. उन्हाळय़ात ही घरे वातानुकुलित यंत्रणेप्रमाणेच काम करतात. तर हिवाळय़ात घरांमध्ये नैसर्गिक स्वरुपात उबदारपणा असतो.

गावाचा इतिहास

मंगोल हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी या ग्रामस्थांच्या पूर्वजांनी हे गाव वसविले होते. कंदोवन गावाचे पहिले रहिवासी हे मंगोलांच्या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी येथे पोहोचले होते. येथे मंगोल हल्लेखोरांपासून लपण्यासाठी पर्वतीय क्षेत्रांमध्ये निवारा शोधायचे. एकप्रकारे तेथे बिळ खोदून त्यात राहत होते. कालौघात हेच त्यांचे कायमस्वरुपी घर ठरले. आता हे गाव जगभरात स्वतःच्या अनोख्या घरांसाठी ओळखले जाऊ लागले आहे.

Related Stories

मेहुल चोक्सी सुनावणीस अनुपस्थित

Patil_p

कोरोना रुग्णसंख्येत फ्रान्स जगात चौथ्या स्थानी

datta jadhav

कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानसाठी पुढाकार घ्यावा

datta jadhav

कोरोनाबाधित नेत्यांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प

Patil_p

पाकिस्तान : रावळपिंडीत 100 वर्ष जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला

datta jadhav

चीनमध्ये लसींच्या चाचणीस प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!