Tarun Bharat

प्रमुख समभागांच्या कामगिरीने बाजार वधारला

Advertisements

दुसऱया दिवशीही तेजी ः सेन्सेक्समध्ये 130 अंकांची वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स व निफ्टी तेजीत राहिले होते. यामध्ये चलनवाढ आणि औद्योगिक उत्पादन यांचे आकडे सादर होण्याच्या अगोदरच बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टील यासारख्या कंपन्यांमध्ये मजबूत स्थिती राहिल्याचे दिसून आले.

बाजारात प्रारंभीच्या काळात घसरण राहिली त्यानंतर काहीसा बाजार सावरला असून बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 130.18 अंकांनी वधारुन निर्देशांक 59,462.78 अंकांवर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 39.15 अंकांनी वाढून निर्देशांक 17,698.15 वर बंद झाला आहे.

शुक्रवारच्या सत्रात जागतिक बजारात आणि विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह कायम राहिल्याने बाजारात सकारात्मक वातावरण राहिल्याचा फायदा भांडवली बाजाराला झाला असल्याचे दिसून आले. यामध्ये माहिती तंत्रज्ञान व आरोग्य कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. औद्योगिक उत्पादन निर्देशांक आणि ग्राहक मूल्य निर्देशांक यांचे आकडे सादर होण्याअगोदरच मुख्य कंपन्यांच्या समभागांची खरेदी गुंतवणूकदारांनी केली आहे.

मुख्य कंपन्यांपैकी एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 3.26 टक्क्यांनी तेजीत होते. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, पॉवरग्रिड कॉर्प, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक आणि आयटीसी यांचे समभाग तेजीत राहिले. तर दुसरीकडे इन्फोसिस, मारुती सुझुकी, लार्सन ऍण्ड टुब्रो, टेक महिंद्रा, सनफार्मा आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.  आशियातील अन्य बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि जपानचा निक्की हे लाभात राहिले. तर चीनचा शांघाय कम्पोझिट नुकसानीसह बंद झाले आहे. बाजारात निव्वळ 2,298.08 कोटी रुपयाच्या किमतीच्या समभागांची विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

‘विवो’ भारतात करणार 7500 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

कॉर्पोरेट बॉण्ड इश्यू 25 टक्क्यांनी वधारला

Omkar B

वाहनांची संख्या घटल्यास, नवी वाहने होणार स्वस्त?

Patil_p

सार्वजनिक खर्च वाढवा

Patil_p

इक्सिगोचा येणार आयपीओ

Patil_p

मारुती सुझुकीच्या कार्स महागणार

Patil_p
error: Content is protected !!