प्रतिनिधी /पणजी
दारूच्या व्यसनामुळे कदंब महामंडळातील बस कंडक्टरची नोकरी घालवली. आता निवृत्तीला अवघी दोन वर्षे राहिली आहेत. आता व्यसनमुक्त झालो असून महामंडळात कुठलेही काम करायला तयार आहे. परत सरकारी नोकरी द्या अशी याचना करून केरी सत्तरी येथील कदंब बस कंडक्टरने सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
दारूच्या व्यसनामुळे चांगली नोकरी गमवावी लागली त्याचा आता पश्चाताप होत आहे. आता व्यसन सुटले असून परत नोकरीत घ्या असा अर्ज आपण कदंब महामंडळाकडे केला होता. त्यावर महामंडळाने अजून निर्णय घेतलेला नाही. किमान त्या अर्जावर सहानुभूतीपर्वक विचार करण्याचा आदेश महामंडळाला द्यावा अशी याचना मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती.
सदर बस कंडक्टरला दि. 23 मार्च 2012 रोजी सेवेतून बडतफ्&ढ करण्यात आले होते. 6 महिने तो कामालाच आला नाही असा त्याच्यावर आरोप होता. तो रोज कामाला जायला घरून जेवणाचा डबा घेऊन निघत होता पण कामाला जाण्याऐवजी नशा करण्यात वेळ सरायचा. नोकरी जाऊन दहा वर्षे झाली तरी त्या बडतफ्ढाaला आव्हान दिले गेले नाही.
शेवटी व्यसनमुक्त झाल्यावर नोकरी आठवली निवृत्तीला अवघी दोनच वर्षे बाकी आहेत. घरी मिळकतीचे दुसरे कुठले साधन नाही त्यामुळे कुठलीही नोकरी द्यावी करायला तयार आहे अशी याचना त्याने केली होती.
व्यसनमुक्त झाला हे ठिक आहे पण 10 वर्षानंतर जागा झालेल्याची याचना का म्हणून विचारात घ्यावी असा सवाल उच्च न्यायालयाने केला. कदंब महामंडळाने विचार करावा, असा आदेश जारी केला. नोकरी मिळवण्याचा दावा करण्यास नवे कारण होईल. असा दावा करायचा असल्यास त्याला कायदेशीर मार्गानेच जायला हवे असा साधा अर्ज करून हेतू साद्य करता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याचे नमूद करून सदर बडतफ्&ढ कदंब बस कंडक्टरची याचिका उच्च न्यायालयाने फ्sढटाळली.