Tarun Bharat

राज्यसभा निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट

छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेशात बिनविरोध तर कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणात चुरस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राज्यसभेच्या 58 जागांसाठी होणाऱया निवडणुकीतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शुक्रवार हा निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तो संपल्यानंतर आता अनेक राज्यांमध्ये ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले असून कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानात एका जागेसाठी चुरशीची स्पर्धा होणार हे देखील स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या 11 जागा असून त्यापैकी 8 भाजपला आणि 3 समाजवादी पक्षाला मिळणार हे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने लढतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने बिनविरोध निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला.

आंध्र, झारखंडात बिनविरोध

आंध्र प्रदेशात राज्यासभेच्या चार जागांपैकी सर्व सत्ताधारी वायएसआर काँगेसने बिनविरोध जिंकल्या आहेत. तर झारखंडमधील दोन जागांपैकी एक जागा सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा तर एक जागा भाजपने निर्विरोध प्राप्त केली. मध्यप्रदेशातही 3 जागांपैकी भाजपला दोन तर काँगेसला 1 अशी विभागणी झाली. छत्तीसगडमधील दोन जागांपैकी सर्व काँगेसने बिनविरोध पदरात पाडून घेतल्या.

कर्नाटक, महाराष्ट्रात रंगदरात लढती

कर्नाटकात राज्यसभेच्या चार जागा आहेत. त्यापैकी भाजपच्या दोन आणि काँगेसची एक जागा निश्चित आहे. चौथ्या जागासाठी भाजपने लेहरसिंग यांना उमेदवारी दिल्याने लढत होणार आहे. महाराष्ट्रातही सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने मतदान घ्यावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. हरियाणात दोन जागांसाठी तीन उमेदवार मैदानात आहेत. तिसऱया जागेसाठी भाजप आणि काँगेस यांच्यात तीव्र चुरस असणार हे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे.

Related Stories

थिएटरमालकांना नियम-अटी निश्चित करण्याचा अधिकार

Patil_p

मुकेश अंबानी बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

datta jadhav

2 महिला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार

Patil_p

राजस्थानात 24 तासांमध्ये 500 गायींचा मृत्यू

Patil_p

देशात कोरोना रुग्णांची संख्या 4,421 वर

prashant_c

स्वातंत्र्यदिन सोहळा यंदा ‘नियमबद्ध’

Patil_p