बाथरुम, किंग साइज बेडचा अंतर्भाव
हॉलिवूड मॉडेल, उद्योजिका किम कार्दशियनची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अलिकडेच तिने स्क्रीन ब्रँडला री-लाँच करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. याचबरोबर किमने पहिल्यांदाच प्रायव्हेट जेट खरेदी केले आहे. हे विमान किमने स्वतःच्या पसंतीनुसार तयार करवून घेतले आहे. 41 वर्षीय अब्जाधीश किम स्वतःच्या विमानातून डॉमिकन रिपब्लिकसाठी रवाना झाली. टेकऑफ करण्यापूर्वी किमने स्वतःचे चाहते आणि प्रियकराला फेसटाइमद्वारे विमानाची सैर करविली आहे.
किमच्या या विमानात किंग साइज बेड असून दोन बाथरुम आहेत. तसेच आरामदायी सीट्स असून त्यावर हेडरेस्ट लावण्यात आले आहे. प्रत्येक सीटसोबत एक स्वतंत्र फोन चॉर्जर पॉइंट आहे. हे विमान म्हणजे माझे स्वप्नातील घर असल्याचे तिचे म्हणणे आहे.
हे विमान माझ्या जीवनातील मेहनत दर्शवित असल्याचे तिने म्हटले आहे. मित्र आण चीमसोबत या विमानातून प्रवास करताना ती अत्यंत आनंदी दिसून आली. किमने याला ‘किम एअर’ नाव दिले आहे. किमचे हे विमान गल्फस्ट्रीम जी650ईआर असून याची किंमत 95 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. किमच्या या विमानातून प्रवास करणाऱयाला ‘स्किम्स’ ब्रँडची चप्पल आणि पोशाख देण्यात येणार आहे. या विमानातून सुमारे 18 लोक एकाचवेळी प्रवास करू शकतात.