वाहतुकीला अडथळा : अपघाताची शक्मयता, दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात अनेक ठिकाणी सीडी वर्क कामाची दुरवस्था झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खडेबाजारच्या प्रवेशद्वारावर सीडीवर्क खचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपासून याकडे दुर्लक्ष झाले आहे. अपघात घडू नये यासाठी बॅरिकेड्स लावून केवळ वेळ मारून नेली जात आहे. मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.
स्मार्ट सीटी अंतर्गत शहरात रस्ते, गटारी, वाहिन्या आणि सीडी वर्कची विकासकामे केली जात आहेत. मात्र बऱयाच ठिकाणी अर्धवट असलेल्या कामामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. शिवाय वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाबाबत रहिवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. खडेबाजार प्रवेशद्वारावरच सीडीवर्क खचल्याने रहदारीला अडचण होत आहेत. या मार्गावर सतत वाहने, पादचारी, रिक्षावाले व प्रवाशांची वर्दळ असते. शिवाय नागरिक बाजारात या रस्त्यानेच जात असल्यामुळे रहदारी अधिक असते. मात्र मार्गाच्या तोंडावरच सीडीवर्क खचल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर सीडीवर्क दुरुस्ती काम त्वरित करण्याची मागणी होत आहे.