Tarun Bharat

पाण्याविना नागरिकांचे हाल

Advertisements

विविध ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा : जलवाहिनी दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

शहापूर-जुने बेळगाव परिसराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला हिंदवाडीनजीक गळती लागल्याने मंगळवारी दुपारपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. बुधवारी या परिसरातील विविध भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. काही नागरिकांना पाणी मिळाले नसल्याने टँकरने पाणी विकत घ्यावे लागले.

शहर आणि उपनगरात गॅस वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. गॅसवाहिन्या घालताना आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. परिणामी ठिकठिकाणी जलवाहिन्यांचे नुकसान होत आहे. घरोघरी जोडण्यात आलेल्या  जलवाहिन्या तुटल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रमुख जलवाहिन्यांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. गॅस वाहिनी घालण्यात येत असताना हिंदवाडीजवळ मुख्य जलवाहिनीचे नुकसान झाले. शहापूर, जुने बेळगाव, खासबाग अशा विविध परिसरात या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, प्रमुख जलवाहिनीच फुटल्याने या भागातील संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण याकरिता पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला आहे. भारतनगर, शहापूर, जुने बेळगाव, खासबाग आदींसह या भागातील विविध गल्ल्यांमधील पाणीपुरवठा ठप्प झाला. दुरुस्तीसाठी दोन दिवस लागणार असल्याने पाण्याविना नागरिकांचे हाल झाले.

 टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ

नियमित पाणीपुरवठा करण्यात येणाऱया भागात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी टँकरने पाणीपुरवठय़ाची मागणी केली. काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. पण काही ठिकाणी पाणीपुरवठा केला नसल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागले.

गॅसवाहिन्या घालताना खबरदारी घ्या

अनियमित पाणीपुरवठय़ामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मुबलक पाणीसाठा असूनही यंदा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच गॅसवाहिन्यांमुळे जलवाहिन्यांचे नुकसान होत असल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे. गॅसवाहिन्या घालताना जलवाहिन्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Related Stories

अधिक दराने रेमडेसिवीरची विक्री करणाऱयांवर कारवाई करा

Amit Kulkarni

सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन

Amit Kulkarni

काकतकर महाविद्यालयात कायद्यांबाबत मार्गदर्शन

Amit Kulkarni

काकतिवेस रोडवर हजारो लिटर पाणी वाया

Nilkanth Sonar

विघ्नहर्त्यांनेच कोरोनाचे संकट दूर करावे

Patil_p

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाला गती आणा

Amit Kulkarni
error: Content is protected !!